Shivsena
Shivsena Sakal
मुंबई

शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन, महापालिका निवडणुकांबाबत महत्वाची घोषणा?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शिवसेनेचा (Shivsena) 55 वा वर्धापन दिन (Anniversary) शनिवारी (ता. 19) ला होणार आहे. कोविडमुळे (Covid) यंदाही शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत. यात कोविडच्या तिसऱ्या लाटेसोबतच आगामी महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसबाबत काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Shivsena 55th Anniversary Municipal Election Important Announcing Politics)

शिवसेनेचा वर्धापन दिन यंदाही कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईनच होणार आहे. सर्व शिवसैनिकांनी शाखांमध्ये सकाळी जमून सध्याच्या परिस्थितीला अनुसरुन सामाजिक कार्यक्रम करावे असे कळविण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यंदाही ऑनलाईन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ठाकरे यांनी वेळोवेळी आगामी सर्व निवडणुका सोबत लढविण्याचे आवाहन महाआघाडीला केले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तिन्ही पक्षांनी सोबत निवडणुक लढवावी अशी भुमिका मांडली आहे. मात्र, काँग्रेसने आगामी सर्व निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे महायुतीसोबतच्या विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच्या आगामी वाटचाली बाबत काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोविडमुळे वर्षभरापासून रखडलेल्या काही महानगर पालिका आणि नगर पालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर,फेब्रुवारी महिन्यात मुंबई ठाण्यासह महत्वाच्या महानगर पालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे.या निवडणुकांसाठी शिवसेनेची भुमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पालिकेतील पक्ष कार्यालयाचे आज उदघाटन

मुंबई महानगर पालिकेतील शिवसेनेच्या नव्या पक्ष कार्यालयाचे सकाळी 11 वाजता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. महानगर पालिकेच्या जुन्या (हेरीटेज) इमारतीत हे कार्यालय तयार करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda : वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

SCROLL FOR NEXT