Aditya Thackeray  
मुंबई

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; शासकीय कामात आणला होता अडथळा!

शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे हे अडचणीत आले आहेत. कारण त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे हे अडचणीत आले आहेत. कारण त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. लोवर परळ येथील डिलाई रोड ब्रिज लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

एन एम जोशी पोलिस स्टेशन येथे मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आलीये. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. उशिरा रात्री त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आदित्य ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

गुरुवारी आदित्य ठाकरेंकडून डिलाई ब्रिज रोडच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन करण्यात आले होते. या लेनचे काम अद्याप पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे बेकायदेशीर आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सामने दिली आहे.

काम पूर्ण झालेलं नसताना लेनचं उद्घाटन झालंय असं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. काही दिवसानंतर ही लेन सुरु करण्याचे पालिकेचे नियोजन होते. त्याआधीच आदित्य ठाकरे यांच्याकडून लेनचे उद्धाटन करण्यात आले आणि वाहतूक सुरु करण्यात आली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : ‘आम्ही मानवतेच्या दृष्टीने न्याय मागतोय’; ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT