Ambadas Danve 
मुंबई

Ambadas Danve: शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांच्यावर कारवाई! सभागृहातून 5 दिवसांचे निलंबन

Shivsena UBT Ambadas Danve: विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसासाठी निलंबन करण्यात आले आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता.

कार्तिक पुजारी

मुंबई- विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसासाठी निलंबन करण्यात आले आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर सभापतींनी निलंबनाचा निर्णय घेतला. दानवे यांचे निलंबन झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सभापतींच्या विरोधात देखील विरोधकांनी घोषणाबाजी केली.

विरोधकांकडून या मुद्द्यावर चर्चेची मागणी करण्यात आली होती. पण, सभापतींनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना सभापतींनी खडेबोल सुनावले. सभागृहामध्ये अशा प्रकारचे शब्द वापरणे चुकीचे आहे. ही कसली संस्कृती आहे. त्यांच्या नेत्यांनी त्यांना समजवायला हवे. कारण, अशा वक्तव्यमुळे चुकीचा पायंडा पडेल, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.

चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात प्रस्ताव मांडला. अशा प्रकारचे वक्तव्य आणि शिवीगाळ विधिमंडळात करणे अत्यंत चुकीचे आहे असं त्यांनी म्हटलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावरून प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी यापूर्वी कधीही करण्यात आली नव्हती. अत्यंत असभ्य आणि आक्षेपार्ह शब्दांचा सभागृहात वापर करण्यात आला, असं फडणवीस म्हणाले.

निलम गोऱ्हे म्हणाल्या की, आपण चूक केलं अशा प्रकारची त्यांच्यामध्ये कोणतीही भावना दिसत नाही. माझ्यावर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात येत आहे. पण, घटनेचा प्रकार क्लेषदायक होता. एका महिला उपासभापतींसमोर नेता असं बोलू लागला, तर प्रत्येकजण असा बोलू लागेल. आम्ही आता अनुभवातून कठोर झालो आहोत, पण दुसऱ्या महिलांचे काय? महिलांना असुरक्षित वाटेल असं काहीही व्हायला नको.

अंबादास दानवे यांनी सभागृहात भाजप नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. दानवेंनी असभ्य भाषेचा वापर केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रसाद लाड यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी केली होती. त्यानंतर त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याचा निर्णय उपसभापतींनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ! इतकी वर्ष संघासोबत असलेल्या भरवशाच्या खेळाडूने साथ सोडली, MS Dhoni...

Trending : आता रात्री होणार नाही अंधार! अंतराळात लागणार ६० फुटांचा आरसा; अमेरिकेच्या प्लॅनने वैज्ञानिक चक्रावले, नेमका विषय काय?

Newly Married Woman : 2 दिवसांनी होतं मुलीचं बारसं, घरात चालू होती तयारी; पण त्याआधीच 23 वर्षांच्या 'या' उच्चशिक्षित माऊलीनं...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune Airport: पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल ‘बिकास’च्या प्रतीक्षेत; दीड वर्षापासून बंद, पुनर्विकासासाठी २४ कोटी रुपयांचा खर्च

SCROLL FOR NEXT