Thane Municipal  sakal media
मुंबई

ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना-राष्ट्रवादीत राडा; नगरसेवक भिडले

सकाळ वृ्त्तसेवा

ठाणे : एकीकडे राज्यात (maharashtra) शिवसेना-राष्ट्रवादी (shivsena-ncp) एकत्रित सत्तेत असतांना मात्र ठाण्यात (thane politics) शिवसेना राष्ट्रवादी कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमीच एकमेकांच्या विरोधात असतांना पाहायला मिळतेय, आज देखील ठाणे महानगर पालिकेच्या (thane municipal corporation general assembly) सर्वसाधारण महासभेत महाविकास आघाडीत असलेले शिवसेना राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांना (corporators debate) भिडतांना पाहायला मिळाले. (Shivsena and ncp debate in thane municipal corporation general assembly)

ठाणे महानगरपालिकेच्या आज सुरु असलेल्या महासभेत महापालिका विरोधी पक्षनेते अशरफ शानु पठाण आणि राष्ट्रवादी चे नगरसेवक विकास कामे होत नसल्याच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान महापालिका विरोधी पक्षनेते अशरफ शानु पठाण यांनी महासभा सुरु असतांना मुंब्रा भागातील पाणी प्रश्नावर महापौर नरेश म्हस्के यांच्या समोर झोपुन जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. सत्ताधारी शिवसेना आणि महापालिका प्रशासन नेहमीच आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते तसच आमच्या प्रभागातील विकासकामे होऊ देत नाही असा आरोप करत राष्ट्रवादी च्या नगरसेवकांनी हे आंदोलन केले.

यादरम्यान भाजप ने देखील संधी साधत आम्ही दोघे भाऊ भाऊ आम्ही सर्व मिळुन खाऊ, महाआघाडीत झाली बिघाडी अशा घोषणा देत शिवसेना राष्ट्रवादी च्या नगरसेवकांना डीचावायला सुरुवात केली. महासभेत २० मिनिट सत्ताधारी आणि विरोधक असा मोठा गोंधळ यावेळी पाहायला मिळाला. आजच्या या गोंधळामुळे राज्यातील महाविकास आघाडीत मांडीला मांडी लावुन सत्तेत असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी मात्र ठाण्यात एकमेकांच्या विरोधात असलेली पाहायला मिळतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT