मुंबई

'सेना भवनाकडे वाकडी नजर करु नका एवढीच अपेक्षा'

दीनानाथ परब

मुंबई: भारतीय जनता युवा मोर्चाने आज थेट मुंबईत शिवसेना भवनावर (shivsena bhavan) 'फटकार मोर्चा' आयोजित केला होता. अयोध्येतील श्री राम मंदिर (ram mandir) बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत कागदपत्रे खोटी आणि बनावट असल्याचं वक्तव्य शिवसेनेकडून करण्यात आले तसेच, या जमिनीबाबत घोटाळा झाल्याचा संशय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे भाजपाने थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. (Shivsena bjp activist calsh near to dadar shivsena bhavan dont instigate us shivsena mla sada sarvankar)

यावेळी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही बाजूंकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. हा सर्व राडा सुरु असताना माहिम विधानसभेचे शिवसेना आमदार सदा सरवणकर तिथे उपस्थित होते.

"राम जन्मभूमीसाठी शिवसेनाप्रमुखांनी जी आंदोलन केली ती हिंदुस्थानला माहित आहेत. राम जन्मभूमी हा आमचा वयैक्तीक विषय आहे, तो आम्ही पूर्ण करणार अशी भाजपाकडून वातावरण निर्मिती सुरु आहे. त्यामुळे ही समस्या निर्माण झालीय" असे माहिम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर म्हणाले.

"सेनाभवनावर कोणी आक्रमण करणार असेल, तर शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. भाजपाचे कार्यकर्ते चाल करुन सेना भवनाकडे येत आहेत, हे समजल्यानंतर आमच्या महिला तिथे गेल्या. त्यांना चप्पल काढून दाखवण्यात आली. त्यातून नंतर हा सर्व प्रकार घडला. आम्ही घरी सवस्थ झोपून राहू असं होणार नाही. सेनाभवनकडे वाकडी नजर करु नका, एवढीच अपेक्षा आहे. भाजपाने शांततेत आंदोलन केलं असतं, तर आमचा विरोध नव्हता. पण कोणी दगड, धोंडे घेऊन येणार असेल, तर स्वस्थ बसणार नाही" असे सदा सरवणकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT