मुंबई

'या' प्रमुख सात अटीवर झाली सेना-भाजप युती

सकाळन्यूजनेटवर्क

लोकसभा 2019 ः मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार असून, विधानसभेसाठी 50-50 टक्‍क्‍यांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज 'मातोश्री'वर येत आहेत. 

परंतु, ही युती करण्यासाठी शिवसेनेने भाजपसमोर काही प्रमुख अटी घातल्या आहेत.

1) लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पालघर लोकसभा मतदारसंघ देणार.
2) विधानसभा निवडणुकीत 288 पैकी शिवसेना 144 आणि भाजप 144 असा 50-50 फॉर्म्युला असणार.
3) शिवसेनेनं ही युती फक्त भाजपशी केलेली आहे. भाजपच्या मित्र पक्षांशी नाही.
4) त्यामुळे भाजपच्या 144 जागांपैकी त्यांना मित्र पक्षांसाठी किमान 20 जागा सोडाव्या लागतील.
5) भाजपच्या मित्र पक्षांच्या जागेवर शिवसेना त्यांचे उमेदवार उभे करणार.
6) त्यामुळे विधानसभेत शिवसेना 164 पर्यंत उमेदवार उभे करू शकते.
7) शेतकऱ्यांना 100% कर्जमुक्ती, त्यांच्या उत्पादित पिकांना हमीभाव आणि दुष्काळग्रस्त गावांत तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करणे हीसुद्धा अट शिवसेनेने घातली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT