मुंबई

उल्हासनगरात शिवसेनेने पेटवला पाकिस्तानचा राष्ट्रध्वज

दिनेश गोगी

उल्हासनगर : काश्मीरमधील पुलवामा येथे आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करून पाकिस्तानचा राष्ट्रध्वज पेटवून 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या.

कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख राजेंद्र साहू, दिलीप गायकवाड, अरुण आशान, संदीप गायकवाड, कैलास तेजी, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, महिला आघाडी संघटक मनीषा भानुशाली, स्मिता चिखकलर, शहर संघटक सागर उटवाल, नगरसेवक स्वपिल बागूल, माजी नगरसेवक विजय सुपाळे, नथुराम सोनवणे, मनोहर बेहनवाल, प्रकाश माळी, अनिल मराठे, बाबा केळुसकर, सुनील सानप आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहीद मारोती जाधव व कै. रमाकांत चव्हाण रिक्षा चालक -मालक संघटनेने रिक्षा बंद ठेवून भ्याड हल्ल्याचा निषेध केला.

दरम्यान, भारतीय सैन्यावरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उल्हासनगर तर्फे उल्हासनगर 1 येथील बस स्टॉप येथे पाकिस्तान व दहशतवादी खलील अहमदचा पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव संजय घुगे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख, उप-जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे, शहर संघटक मैनुद्दीन शेख, विभाग अध्यक्ष कैलास वाघ, बादशहा शेख,उप-विभाग अध्यक्ष काळू थोरात, राहुल वाकेकर, महेश जाधव, दीपक वाडे, सुरेश सौदागर तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT