Aditya Thackeray 
मुंबई

Vidhan Sabha 2019 : बाळासाहेबांचे दर्शन घेऊन आदित्यने टाकले मातोश्रीबाहेर पाऊल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आदित्य ठाकरे आज (गुरुवार) वरळी विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरत आहेत. त्यापूर्वी त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगल काम कर अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

आदित्य ठाकरे आज अर्ज भरण्यासाठी रवाना होत असताना पत्रकारांशी बोलले. त्याठिकाणी पदयात्रा काढण्यात येणार आहे. चांगलं काम कर अशा शुभेच्छा उद्धव ठाकरेंनी दिल्या. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची सेवा करण्याची इच्छा असल्याचे आदित्य यांनी सांगितले.

त्यापूर्वी बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्यसाठी कोणत्याही विरोधकाकडे जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. जे काही बोलायचे आहे ते दसरा मेळाव्यात बोलेन, असेही ते म्हणाले होते. 

तरुणांनी पुढे यावे 
महाराष्ट्राच्या विकासासाठी आदित्य राजकारणात उतरला आहे. त्याप्रमाणे तरुणांनी पुढे येऊन राजकारण हातात घ्यावे. आता तरुणांनी पुढे येऊन महाराष्ट्र आणि देश घडवला पाहिजे, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईकरांवर जलसंकटाचे सावट! पाणीकपातीत वाढ होणार, पालिकेचा मोठा निर्णय; कधीपासून आणि का?

Video: बापरे! बनावट दुधाचा तलाव बघितला का? शेकडो टँकर्स केले रिकामे; व्हिडीओ नेमका कुठला?

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेची वेळ बदलली, 'या' वेळेस प्रेक्षकांच्या भेटीला, कोण घेणार निरोप?

Latest Marathi News Live Update : ऑगस्ट २०२७पर्यंत पिण्याचं पाणी सुरक्षित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Pune News : शुल्कनिश्‍चितीनंतरही प्लंबरकडून नळजोडासाठी लूट सुरुच; महापालिका प्रशासनाचे नियंत्रण नाही

SCROLL FOR NEXT