vilas chavari esakal
मुंबई

Shivsena: दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरे गटात पक्षगळती! सीमोल्लंघन करून माजी नगरसेवक शिंदे गटात

शिवसेना: ठाकरे गटात पक्षगळती! माजी नगरसेवक शिंदे गटात सीमोल्लंघन करून प्रवेश

CD

मुंबई, ता. २४ ः ठाकरे गटाचे वांद्रे येथील माजी नगरसेवक विलास चावरी यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच असून आतापर्यंत ३५ हून अधिक माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. कोळी बांधवांचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिली.

प्रभाग क्रमांक ९९ चे माजी नगरसेवक चावरी यांनी २०१४ मध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. रायगड जिल्ह्याचे ते संपर्कप्रमुखही होते. खारदांडाचे शाखाप्रमुख पदही काही वर्षे त्यांनी भूषवले होते. २००७ ते २०१२ अशी दोन टर्म ते शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. चावरी यांच्या समवेत उपशहरप्रमुख विकास चव्हाण, गटप्रमुख विजय खरपुडे, अजय शिगवण आदींनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

‘गेल्या काही वर्षांत नेतृत्वाकडून अपेक्षित मदत मिळत नव्हती. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला कामाचा धडाका पाहून मी प्रभावित झालो,’ असे मत चावरी यांनी व्यक्त केले.
कोळी बांधवांना मासेमारी करताना अडचण येऊ नये यासाठी कोस्टल रोड बांधणी करताना दोन खांबांतील अंतर वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला. मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत कोळीवाड्यांचा सुनियोजित विकास करून देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासह त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT