Shivsena Uddhav Thackeray  Sakal
मुंबई

Shivsena : 'थेट मैदानात उतरून दसरा मेळावा घेऊ'; शिवसेना आक्रमक, प्रकरण कोर्टात जाणार?

काहीही झालं तरी दसरा मेळावा फक्त आणि फक्त शिवतीर्थावरच होणार अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेचा दसरा मेळावा हा गेल्या काही दिवसांपासून कळीचा आणि मानाचा मुद्दा बनला आहे. शिवसेनेतल्या बंडाचा फटका दसरा मेळाव्यालाही बसला आहे. सेनेची परंपरा असलेला मेळावा आता ठाकरे शिवाजी पार्कवर घेणार की बंड केलेले एकनाथ शिंदे घेणार यावरुन वादंग सुरू आहे. याच प्रकरणात आता शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा मुद्दा ताणला जात आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता यावा यासाठी शिवसेनेसह शिंदे गटानेही अर्ज केला आहे. मात्र महापालिकेने अद्याप शिवाजी पार्क मैदानाबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे बीकेसीमधल्या दोन मैदानांसाठी दोन्ही गटांनी अर्ज केले होते. त्यातल्या शिंदे गटाचा अर्ज पालिकेने स्विकारला असून ठाकरेंचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे या गोंधळात आणखी भर पडली म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

'साम टीव्ही'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मात्र हा गोंधळ आता आणखी वाढला तर शिवसेना शिवाजी पार्कसाठी थेट न्यायालयाची पायरी चढणार आहे. त्यामुळे आता दसरा मेळावा थेट कोर्टात जाणार असल्याची चर्चा आहे. आपण फक्त आणि फक्त शिवतीर्थावरच घेणार अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. आता महापालिकेने जर शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान नाकारलं तर मात्र शिवसेना थेट कोर्टात जाणार आहे. महापालिकेने जर प्रकरण ताणलं तर थेट मैदानात जाऊन मेळावा घेण्याची तयारीही शिवसेनेने दाखवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT