मुंबई

Sitaram Dalvi Passed Away: बाळासाहेब ठाकरेंचे ज्येष्ठ सहकाऱ्याचं निधन! राज ठाकरेंनी केली पोस्ट

Raj Thackeray Post after Sitaram Dalvi Passed Away: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ सहकारी आणि शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज निधन झाले आहे.

रोहित कणसे

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ सहकारी आणि शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज निधन झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केलेल्या निष्‍ठावान शिवसैनिका पैकी ते एक होते. तसेच अंधेरी विधानसभा मतदारसंघातून १९९५ साली शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळवला होता.

दरम्यान सीताराम दळवी यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे.

राज ठाकरे काय म्हणालेत?

शिवसेनेचे माजी आमदार, स्व.बाळासाहेबांचे ज्येष्ठ सहकारी आणि माझे सहकारी श्री. संदीप दळवी यांचे वडील सीताराम दळवी यांचं निधन झालं. सीताराम दळवी यांनी शिवसेनेच्या उमेदीच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल्या पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग होता. शिवसेना मुंबई उपनगरांत रुजवण्यात सीताराम दळवी यांचा महत्वाचा वाटा. सीताराम दळवी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT