Suryakant Desai 
मुंबई

Suryakant Desai: रस्त्यातच रुग्णवाहिका बंद पडली! वेळेत उपचार न मिळाल्यानं शिवसेनेच्या माजी आमदाराचं निधन

देसाई यांच्यावर डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली : शिवसेनेचे परळ लालबाग विधानसभा मतदार संघातील माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे शुक्रवारी डोंबिवलीत निधन झालं. विशेष म्हणजे दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडल्यानं त्यांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. देसाई यांच्यावर डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, व्हेंटिलेटर नसल्यानं रुग्णलयानं देसाई यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास कुटुंबियांना सांगितलं. मात्र, दुसऱ्या रुग्णालयात देसाई यांना घेऊन जात असताना रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडली. यानंतर रुग्णवाहिका ढकलण्याची वेळ देसाई कुटुंबीयांवर आली.

पोलिसांत तक्रार देणार

शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व येथील एका हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. त्यानंतर देसाई कुटुंबियांनी मंजुनाथ शाळेपर्यंत रुग्णवाहिका ढकलत न्यावी लागली. या पार्श्वभूमीवर देसाई यांचा मुलगा ऋषिकेश यानं साई पूजा रुग्णवाहिकेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचं सांगितलं.

परळ-लालबागचं केलं होतं नेतृत्व

माजी आमदार देसाई हे सन १९९५ ते २००० या काळात परळ-लालबाग विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. गेली 23 वर्ष देसाई हे डोंबिवली पश्चिम येथील भागशाला मैदान या भागात वास्तव्यास होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT