Sanjay Raut 
मुंबई

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Swapna Patkar: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोरे यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे

कार्तिक पुजारी

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोरे यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे. गोरे यांनी स्वप्ना पाटकर यांचे निवेदन वाचून दाखवले आहे. यात संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

निलम गोरे यांनी स्वप्ना पाटकर यांचे कथित निवेदन वाचून दाखवले. त्यात असा उल्लेख आहे की, मी स्वप्ना पाटकर आई सोबत सांताक्रुझ येथे रहाते. संजय राऊत माझा आणि माझ्या कुटुंबाचा छळ करत आहे. आतापर्यंत हजारो पत्रं लिहिली तरी मला त्रास होतो आहे. जिथे जाते तिथे माझा पाठलाग होतो. ३ मे ला देखील माझा BKC येथे पाठलाग झाला. याआधी देखील माझ्यावर हल्ला झाला आहे. गुन्हा दाखल आहे पण पुढे काहीच झालं नाही.

पुढे यात असा उल्लेख आहे की, संजय राऊत यांनी माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्टार गुप्तहेर नेमले आहेत. एकाला अटक देखील झाली पण संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली नाही. व्यंकटेशची संजय राऊत यांनी हत्या केली असू शकते. संजय राऊत यांनी मला धमकी दिली शिवीगाळ केली पण कारवाई झाली नाही. संजय राऊत यांना पोलीस ठाण्यात बोलावले जात नाही. दुबई आणि पाकिस्तानातून धमकीचे कॉल आले.गाडीवर हल्ला करून धमकी देण्यात आले . घरावर दारूच्या बाटल्या फेकल्या.

माझे चारित्र्य तपासण्यासाठी संजय राऊत यांनी पोलिसांना सांगितले होते.प्रताप दराडे यांच्या मदतीने गुन्हा नोंदवला. संजय राऊत यांनी मला वारंवार लज्जित केले आहे. संजय राऊत यांचा अहंकार तृप्त करण्यासाठी पोलिसांनी मला त्रास दिला. त्यांनी माझं समुपदेशनाच काम बंद केलं. पत्राचाळ प्रकरणी मी केलेल्या खुलाशांमुळे त्यांना अटक झाली.संजय राऊत यांच्या बॉसकडे तक्रार केली आहे पण कारवाई झाली नाही. मला मारले जाई पर्यंत वाट बघू नका अशी त्यानी विनंती केली आहे, असा निवेदनात उल्लेख असल्याचं निलम गोऱ्हे म्हणाल्या. या आरोपांचा आणि लोकसभेचा काही संबंध नसल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात संजय राऊत यांना अटक झाली होती. याप्रकरणी स्वप्ना पाटकर यांनी मोठे खुलासे केले होते. याशिवाय संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्यामधील संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात अश्लील आरोप आणि धमकी दिल्याचा आरोप होता. याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्वप्ना पाटकर या मुंबईच्या सांताक्रूझ भागात राहतात. ४२ वर्षीय पाटकर या सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांचं मुंबईत एक क्लिनिक आहे. २००७ मध्ये संजय राऊत आणि पाटकर यांची भेट झाली होती. त्यानंतर राऊत-पाटकर यांच्यामध्ये कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. पण, काही काळाने पार्टनरशिपच्या मुद्द्यावरुन कुटुंबात वाद निर्माण झाल्याच सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT