sanjay raut sanjay raut
मुंबई

प्रेमपत्र येत आहेत, त्यांना उत्तर देऊ- संजय राऊत

कार्तिक पुजारी

शिवसेना नेते अनिब परब यांना ईडीने नोटिस पाठवली आहे. याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली.

मुंबई- शिवसेना नेते अनिब परब यांना ईडीने नोटिस पाठवली आहे. याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. अनिल परब सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आहेत. त्यापेक्षा पक्षाचे सहकारी, उपनेते युवाप्रमुख आहेत. ईडीच्या नोटिसीची टायमिंग पाहिली तर भाजप नेते अनेकदा त्यांचे नाव घेत होते. ईडीने एक डेस्क भाजप कार्यालयात मांडलाय किंवा भाजपच्या एखाद्या अधिकारी, पदाधिकाऱ्याने ईडी कार्यालयात आपला डेस्क टाकला आहे. त्यामुळे हे असं होऊ शकतं, अशी टीका राऊतांनी केली. (Maharashtra Latest News)

अनिल परबांना नोटिस येणार आहे हे भाजपला कसं कळलं. त्यांना या दिवशी नोटिस पाठवण्यात येईल हे त्यांना कसं कळलं? भाजप नेते किरिट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना याची सर्व माहिती आहे. नोटिसी पाठवू द्या, काही हरकत नाही ते प्रेम पत्र आहेत. प्रेम पत्र आम्हालाही आले. आम्ही त्याला उत्तर देऊ. आम्ही पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे कुणाला धमकी देणार नाही. कायदेशीर कारवाईला पूर्णपणे सामोरे जाऊ. यंत्रणेला सहकार्य करु. अनिल परब याला उत्तर देतील, ते समर्थ आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

नोटिस पाठवल्याने सरकार कमजोर होईल, सरकार वाकेल. सरकारला तडे जातील आणि टपून बसलेल्या डोमकावळ्यांना काही फायदा होईस असं काही होणार नाही. असे अनेक घाव आम्ही पचवले आहेत. त्यामुळे आमची आणि अनिल परबांची चिंता करु नका. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर झालेली कारवाई कायदेशीर होती. एखादी जबाबदार व्यक्ती कायद्याचे पालन न करताना बेजाबदार वक्तव्य करत असेल तर कारवाई होऊ शकते. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची आरती करायची का? आम्ही इशाऱ्यांची परवा करत आहेत. त्यांनी कोणत्याही शस्त्रांचा वापर करावा, असंही संजय राऊत म्हणाले. हरयाणानामध्ये दुसरं जालियनबाला बाग झाला. शेतकऱ्याचे रक्त भारतभूमीच्या मातीत पडले, असं म्हणत संजय राऊतांनी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध केला.

देशभरात मंदिर उघडलेत का ? पहा भाजपशासित राज्यात मंदिर उघडले का? पहा केंद्र सरकारने नियम पाठवले आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त काळजी महाराष्ट्राने घ्यायची आहे असं सांगितलं आहे. हिंदुत्ववादी सरकार केंद्रातील आहे असं मी मानतो. त्यांनाही देवळांची चिंता आहे. पण त्यांनीच म्हटलय काळजी घ्य, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT