narayan rane vinayak raut sakal media
मुंबई

''ED च्या नावाने केंद्रीय मंत्र्यांना धमकी देणं शोभतं का?''

नारायण राणेंकडून केंद्रीय मंत्रिपदाचा दुरुपयोग केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ईडीच्या नावानं धमकी देणे केंद्रीय मंत्र्यांना शोभतं का? असा प्रश्न शिनसेनेचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे यांना विचारला आहे. तसेच राणेंनी सत्तेसाठी लाचारी पत्कारली, असा आरोपदेखील राऊत यांनी केला आहे. नारायण राणेंकडून केंद्रीय मंत्रिपदाचा दुरुपयोग केला जात असल्याचेदेखील विनायक राऊत यांनी म्हटले आहे. उद्या गृहमंत्र्यांना भेटून सिंधुदुर्गात झालेल्या राजकीय हत्यांची चौकशी करण्याची, तसेच या प्रकरणाला वाचा फोडण्याची मागणी करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत आहे. ( Shivsena Leader Vinayak Raut Attack On Narayan Rane )

विनायक राऊत म्हणाले की, भाजप गुड बुक्समध्ये राहण्यासाठी केविलवाणी धडपड करत असून, स्वाभिमान गुंडाळून ठेवायचा आणि लाचारी पत्करायची हे नारायण राणेंकडून शिकावे, असा टोलादेखील त्यांनी यावेळी लगावला. एका केंद्रीयमंत्र्याने ईडीच्या नावाचा गैरउपयोग करून धमकी देणे हे चुकीचे असल्याचे राऊत म्हणाले. दुसऱ्यांवर खुनाचे आरोप करताना राणे यांना वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल आणि भुतकाळ आठवत नसेल तर आठवण करून देतो असे राऊत म्हणाले.

सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या कारकीर्दीत खून दरोडे खंडणी आदींचे प्रकार होत होते अशी आठवणदेखील राऊत यांनी यावेळी करून देत रमेश गोवेकर, अंकुश राणे, मंचेकर आदींचे खून कोणी केले? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केले. श्रीधर नाईक खूनात आरोपी म्हणून कोण होत हे जाहीरपणे सांगण्याची वेळ आणू नका असे देखील राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Central Park: महालक्ष्मी रेसकोर्सचा कायापालट होणार, भव्यदिव्य सेंट्रल पार्क उभारणार; एकनाथ शिंदे यांनी प्लॅनच सांगितला

IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

Jio Recharge Offer : महिन्याचा रीचार्ज फक्त ₹103! मोफत OTT आणि AI सब्स्क्रिप्शन; Jio चे Happy New Year साठी 3 जबरदस्त प्लॅन

Chandrapur : माणुसकीला काळिमा फासणारी घटना! कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला विकायला लावली किडनी; सावकारकीचा अमानवी चेहरा समोर..

Indigo Airlines : इंडिगो विमान तब्बल चार तास उशिरा; 21 मंत्री, आमदारांची मोठी गैरसोय, 'इंडिगो'बाबत नेमकं घडतंय काय?

SCROLL FOR NEXT