मुंबई

"एका आमदारामागे एक शाखा प्रमुख" ; सेनेच्या आमदारांवर करडी नजर

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरवात झालीये. अशात आता आमदारांच्या फोडाफोडीला वेग येऊ शकतो. एकीकडे भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला गेलेत. तर, शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक झाली. आता शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार रंगाशारादाकडे जाताना पाहायला मिळतायत. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून आता सावधगिरी बाळगण्यात येतेय. एका आमदारामागे एक शाखा प्रमुख, एक विभाग प्रमुख अशी करडी नजर ठेवली जात असल्याचंही सूत्रांकडून समजतंय. शिवसेनेचे आमदार कुणाशी बोलतायत, कुणाचा फोन घेतायत या सर्व गोष्टी आता तपासल्या जाणारेत. 

मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची महत्वाची बैठक झाली. भाजप सोबत सरकारमध्ये सहभागी व्हायचं की नाही यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. या बैठकीतील वृत्तांत फारच गुप्त ठेवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलाय. बैठकीत आमदारांना मोबाईल आत नेण्यास मनाई करण्यात आली. यामुळे आमदार आत, मोबाईल बाहेर अस दृश्य मातोश्रीवर पाहायला मिळालं. 

मुख्यमंत्रिपदावर शिवसेना अडून आहे. शिवसेनेच्या या भूमिकेने भाजपसमोर मोठा पेच उभा केला आहे. आता पुढे नक्की काय करायचं याचा निर्णय घ्यायची वेळ जवळ आल्याने शिवसेनेने आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या आमदारांशी समोरसमोर  बोलले. 

दरम्यान शिवसेनेच्या आमदारांना मुंबई सोडण्याचे आदेश नाहीत, त्यांना पुढील निरोप येईपर्यंत रंगशारदा इथेच थांबायचे आदेश आहेत. 

WebTitle : shivsena MLA are ordered to stay at rangasharada until next orders


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT