Shivsena MLA bharat gogawale sakal media
मुंबई

महाविकास आघाडीत बिघाडी! रायगडचे पालकमंत्री बदलण्याची शिवसेनेची मागणी

सकाळ वृत्तसेवा

माणगाव : पालकमंत्री पदावरून (Guardian minister) रायगडच्या जिल्ह्यात महाविकास आघाडीत (mva government) बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालकमंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) मनमानी कारभार करत असल्याची तक्रार करत जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री द्यावा, अशी मागणी महाडचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी ‘मातोश्री’कडे केली आहे. दरम्यान, नगरपंचायत निवडणुकीवेळी झालेला शिवसेना-राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमधील (shivsena-ncp dispute) संघर्ष आता पालकमंत्री पदावरून पुन्हा उफाळण्याची शक्‍यता आहे.

रायगडसाठी शिवसेनेचा पालकमंत्री हवा, अशी मागणी आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यासाठी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हेदेखील आपल्यासोबत असल्याचा दावा गोगावले यांनी केला आहे. शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी एकत्र येत विद्यमान पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. गोगावले यांनी आज माणगाव येथे पत्रकार परिषदेत तटकरे यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी केली.

नगरपंचायतीपासून वादाला सुरुवात

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीवेळी शिवसेनेने भाजपची मदत घेतली. त्यामुळे शिवसेनेने महाविकास आघाडीला सुरुंग लावला. त्यामुळे आगामी सर्वच निवडणुकीत शिवसेनेचा वचपा काढा, असे जाहीर आदेश खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले. त्यावर शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेतली असून आमदार गोगावले यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. अदिती तटकरे या मनमानी कारभार करत असून घटक पक्ष म्हणून त्या शिवसेनेला विश्‍वासात घेत नाहीत, असा आरोप गोगावले यांनी केला. त्यामुळे या वादाचे पडसाद आता आगामी निवडणुकांमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: राजगडाच्या वाटेवर दुर्दैवी दुर्घटना; पाबे घाटात मिनी बस दरीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू...

Latest Marathi News Update : श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज वाशीम जिल्ह्यात दुसरा दिवस

IND vs IRE, IND W vs AUS W: आज क्रिकेट चाहत्यांची चांगलच गोंधळणार! टीम इंडियाचे एकाच दिवशी 2 सामने; कुठे आणि किती वाजता पाहणार?

Kolhapur Crime: काेल्हापुरातील पाडळकर मार्केटसमोरील व्हिडिओ पार्लरवर छापा; माजी नगरसेवकावर गुन्हा, साडेचार लाखांची एकवीस मशीन ताब्यात

TET 2026 Paper Leak : त्यांच्याकडे आमदार-खासदार फोडण्याचे कौशल्य; टीईटी पेपरफुटी प्रकरणानंतर अभिजित दीपकेंची सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT