Sanjay-Raut-Attitude E-Sakal
मुंबई

फोन टॅपिंगच्या विषयावर संजय राऊत म्हणाले....

चक्रीवादळापेक्षाही या देशात कोरोनाचं वादळ मोठ

दीनानाथ परब

मुंबई: चक्रीवादळापेक्षाही (cyclone) या देशात कोरोनाचे जे वादळ निर्माण झालं आहे, ते थांबवणं गरजेचं आहे. या कोरोनाच्या वादळाने रोज मृत्यूच्या राशी पडत आहेत, असे संजय राऊत (sanjay raut) म्हणाले. (Shivsena mp sanjay raut on phone tapping)

फोन टॅपिंगच्या विषयावर संजय राऊत म्हणाले....

"देशामध्ये कोणाचे फोन टॅपिंग होत नाही, हे सांगा. आमचे देखील फोन टॅप झाले आहेत आणि आता देखील होत असतील. हा आता राजनैतिक मामला झाला आहे. आम्ही त्याला गंभीरतेने घेत नाही असे राऊत यांनी सांगितले. फोन टॅपिंग हे विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचं एक हत्यार आहे. मी नाना पटोले यांना देखील सांगेन, घाबरू नका फोन टॅपिंग ही काही मोठी गोष्ट नाही."

काय आहे नाना पटोलेंच फोन टॅपिंग प्रकरण?

नाना पटोले हे भाजपचे खासदार असताना २०१७ साली त्यांचा फोन टॅप झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. अमजद खान नावाने हा फोन टॅप झाला असून त्यांच्यासोबत त्यांच्या चारही सहकाऱ्यांचे देखील फोन टॅप झाल्याचे सांगितले जात आहे. मी यासंबंधी आरोप केला नसून मला देखील फोन टॅप झाल्याची माहिती मिळत आहे. त्याबाबत सरकारने योग्य ती कारवाई करावी. मी भाजपचा खासदार होतो, त्यावेळी राज्यात कोणाचं सरकार होतं? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.

प्रत्येकाला त्यांचं व्यक्तीगत स्वातंत्र्य असते. कोणीही कोणाच्या वैयक्तीक आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाही. सरकारच्या मान्यतेशिवाय कोणाचे फोन टॅप करता येऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये गुजरातसारखे राज्य आणण्याचा प्रयत्न केला जात असून माझा फोन टॅप झाला त्यावेळी राज्यात कोणाचं सरकार होतं? असे नाना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT