Police esakal
मुंबई

Mumbai News : शिवसेना पक्षाच्या निधीतून 50 कोटी घेतल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटा विरोधात तपासाला सुरुवात

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात कथित फसवणूक प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात कथित फसवणूक प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ठाकरे गटाने शिवसेना पक्षाच्या निधीतून 50 कोटी बेकायदेशीरपणे घेतल्याचा आरोप आहे. या संदर्भात शिंदे गटाच्या वतीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या आधारावर आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटाने पक्ष निधीतून 50 कोटी रुपये काढून घेतल्याची तक्रार शिंदे गटाने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेत केली होती. शिंदे गटाने पक्षाच्या तपशीलांचा गैरवापर करत फसवणूक करत असल्याचा दावा तक्रारीत केला होता. त्यानंतर ठाकरे गटाच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात आली होती. सोबतच आर्थिक गुन्हे शाखेने आयकर विभागाला देखील पत्र लिहून ठाकरे गटाचा कर कोण भरत आहे याची माहिती मागितली आहे.

दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेने नाव आणि चिन्ह धनुष्यबाण दिले. त्यानंतर आमदार पात्रता आणि अपात्रतेच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरशी झाली होती. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचा निकाल दिला असून शिवसेना पक्ष हा बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निकाल दिला.

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीही नार्वेकर यांनी वैध मानली असता, शिंदे गटाचे सर्व आमदारांना पात्र ठरवले होते. एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार निघून गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT