मुंबई

मुंबई विमानतळावरील 'अदानी एअरपोर्ट्स'चे बोर्ड शिवसैनिकांनी फोडले

मुंबई विमानतळावरील 'अदानी एअरपोर्ट्स'चे बोर्ड शिवसैनिकांनी फोडले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरच लावण्यात आले होते मोठे फलक Shivsena Party Workers break down Adani Airports Boards at Mumbai see video vjb 91

विराज भागवत

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरच लावण्यात आले होते मोठे फलक

मुंबई: विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा अदानी यांच्या कंपनीकडे गेल्यामुळे त्याठिकाणी अदानी एअरपोर्ट्स असे नावाचे बोर्ड लावण्यात आले होते. हे सर्व बोर्ड्स आज शिवसैनिक आणि भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले. अदानी उद्योग समूहाने मुंबई विमानतळाला 'अदानी एअरपोर्ट्स' असं नाव लावलं होतं. या संदर्भात अनेक तक्रारी शिवसैनिकांकडे आल्या. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी आणि भारतीय कामगार सेनेने विमानतळाला लावलेले अदानी एअरपोर्ट्सचे नाव फोडून टाकले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानी यांच्या कंपनीला मिळाला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या विविध परिसरात अदानी एअरपोर्ट्स असे बोर्ड लावण्यात आले. VIP गेट नंबर ८ असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असो या सर्व ठिकाणी अदानी एअरपोर्ट्स असे बोर्ड लावले होते. आधी JVK कंपनीने आपल्या व्यवस्थापनाचे बोर्ड्स तिथे लावले होते. पण अदानी यांच्या कंपनीला व्यवस्थापनाचा ताबा मिळाल्यानंतर त्यांनी विमानतळावर ठिकठिकाणी अदानी एअरपोर्ट्स असे बोर्ड्स लावले. या गोष्टीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. अखेर आज सकाळी शिवसैनिक आणि भारतीय कामगार सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी हे बोर्ड्स फोडून टाकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

SCROLL FOR NEXT