मुंबई

कोंबडी चोर! नारायण राणेंविरोधात शिवसेनेची बॅनरबाजी

नामदेव कुंभार

सूक्ष्म, लघू आणि मध्यम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटल्याचं चित्र आहे. नाशिक, पुणे आणि महाडमध्ये राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईतही शिवसैनिक आक्रमक झाले असून राणेंविरोधात बॅनरबाजी केली आहे. दादरमध्ये शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचे 'कोंबडी चोर' असे होर्डिंग लावले आहे. पोलिसांनी सध्या हे होर्डिंग हटवले आहेत. या होर्डिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिवसैनिकांच्या या आक्रमकपणाला राणे समर्थकांकडून कसं प्रत्युत्तर दिले जाणार याकडे लक्ष लागले आहे. नारायण राणे यांना शिवसेनेने संपूर्ण ताकदीने घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राणे आणि शिवसेना यांच्यातील या वादामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते.

नाशिकमध्ये नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांत नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक करण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले की, चूकीच्या पध्दतीने वक्तव्य करतील तर त्यांना ते भोगावेच लागेल. ज्या पध्दतीने महाडच्या पत्रकार परिषदेत वक्तव्य करण्यात आले त्यावर सायबर क्राईमच्या द्वारे त्यावर करवाई करण्यात येईल. मंत्री पदाचा राजीनामा घ्यावा, मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. मोदींनी राणेंवर कारवाई करावी ही आमची पंतप्रधानांकडे मागणी आहे.

काय म्हणाले होते राणे?

राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखालीच वाजवली असती,’’ असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त राणे यांनी महाडमधील पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की प्रगत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी असा मुख्यमंत्री असणे ही महाराष्ट्राची अधोगती आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान त्यांना नाही. आपल्याला माहीत नसेल तर सचिवाला विचारावे. त्यादिवशी स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव आहे काय, असे त्यांनी कोणाला तरी विचारले. देशाचा कितवा स्वातंत्र्यदिन आहे, हे त्यांना माहीत नाही. माझ्यासारखा तिथे असता तर कानाखालीच वाजवली असती. बाळासाहेबांच्या आदर्शाला तिलांजली देऊन गद्दारी करीत ते मुख्यमंत्री झाल्याची टीकाही राणे यांनी केली. पूरग्रस्तांबाबत राज्य सरकार योग्य मदतकार्य करत नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT