Sanjay Raut Latest News Sanjay Raut Latest News
मुंबई

संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ; 8 ऑगस्टपर्यंत मुक्काम वाढला!

पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत ईडीच्या कोठडीत होते.

दत्ता लवांडे

मुंबई : पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज पुढील सुनावणीसाठी कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना कोठडी वाढणार की जामीन मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असताना कोर्टाने त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांचा पुढील ४ दिवसांचा मुक्कामही ईडीच्या कोठडीत असणार आहे.

(Shivsena MP Sanjay Raut ED Custody)

दरम्यान, पत्राचाळीतील घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी त्यांना ३१ जुलै रोजी ईडीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टाने त्यांनी तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता त्यांना पुन्हा चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊतांच्या चौकशीसाठी अधिक वेळ मागत ईडीने कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

सुनावणी दरम्यान संजय राऊतांनी ईडी कोठडीच्या व्यवस्थेबाबत कोर्टाकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांनीही धमक्या दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. पण ते कोठडीत असताना ते धमक्या कसे देऊ शकतात असा प्रतिप्रश्न कोर्टाने त्यांना केला होता. त्यानंतर अलिबाग येथील जमीन खरेदीवेळी राऊतांच्या पत्नीच्या अकाऊंटवर आलेल्या पैशांच्या संबंधात चौकशी करण्याची मागणी ईडीच्या वकिलांनी केली होती.

यावेळी राऊतांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना अकाऊंटवर आलेले पैसे हे अनोळखी व्यक्तीने पाठवले असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तर हे पैसे कुणी आणि का पाठवले याची चौकशी करायची असल्याचं सांगत ईडीच्या वकिलांनी कोठडीची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत ईडीने संजय राऊतांना ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

Gold Rate Today: आज सोन्याच्या भावात मोठा बदल! एक तोळा सोन्याचा भाव किती? जाणून घ्या ताजा भाव

Axar Patel: अहमदाबादमध्ये सामना? मैं हूँ ना ! अंतिम सामन्याबाबत अक्षर पटेलकडून निर्धास्त राहण्याचा दिलासा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Success Story: गिरवीचा विशाल वाघ ठरला राज्यात अव्‍वल; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, सर्व स्तरांतून होतेय कौतुक

SCROLL FOR NEXT