मुंबई

PM मोदी केवळ गुजरात दौऱ्यावरच का? राऊत म्हणतात...

तौक्ते वादळाने महाराष्ट्र, केरळ, गुजरात आणि इतर राज्यांमध्ये प्रचंड नुकसान केलं

विराज भागवत

तौक्ते वादळाने महाराष्ट्र, केरळ, गुजरात आणि इतर राज्यांमध्ये प्रचंड नुकसान केलं

मुंबई: महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोमवारी वादळाचा तडाखा बसल्यानंतर मंगळवारी या वादळाने गुजरातच्या किनाऱ्याला धडक दिली. तौक्ते चक्रीवादळामुळे येथे प्रचंड नुकसान झाले. वादळामुळे राज्यात सात जणांचा मृत्यू झाला. हजारो झाडे आणि वीजेचे खांब उखडून पडले. तौक्ते वादळामुळे सौराष्ट्र, दीव आणि दमणसह अनेक भागांमध्ये रात्रभर पाऊस कोसळला. या वाऱ्यांमुळे किनारपट्टीवरील अनेक घरांवरील पत्रे उडाले, वीजेचे खांब उखडले गेले. त्यामुळे किनारपट्टीवरील २४३७ गावे अंधारात बुडाली. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भेट दिली. पण इतर राज्यांमधील नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते आले नाहीत, अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर लावला. गुजरातचं सरकार कमकुवत असल्याने मोदी तेथे गेले असावेत, असा टोला त्यांनी लगावला. (Shivsena Sanjay Raut slammed PM Modi over only Gujarat Visit Cyclone Tauktae)

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ गुजरातमधील नुकसानीची पाहणाी करणार आहेत असं समजलं. कदाचित त्यांना वाटत असावं की महाराष्ट्राचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व संकटांशी सामना करण्यासाठी समर्थ आहे. सर्व संकटांशी सामना करणारे नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे अशी पंतप्रधानांना खात्री पटली आहे असं वाटतंय. गुजरातमध्ये (भाजपचं) सरकार कमकुवत आहे. त्यामुळे त्यांनी फक्त तिथलाच दौरा करण्याचे निश्चित केले असावे", अशा शब्दात त्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याचा समाचार घेतला.

निवडणुकांबद्दल भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केलं होतं, त्यावरही राऊत यांनी उत्तर दिलं. "चंद्रकांत पाटील यांचा भाजपने अभिमान बाळगला पाहिजे. ज्या प्रकारे त्यांनी ज्योतिष सांगण्याचा व्यवसाय उघडला आहे, त्यानुसार ते चारशे, पाचशे जागा सहज मिळवू शकतात. इतकंच नव्हे तर जगभरातील सगळ्या पार्लमेंटच्या जागादेखील ते जिंकू शकतात", अशा शब्दात राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी : नाईक

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT