sanjay raut-devendra fadnavis google
मुंबई

Sanjay Raut: मुख्यचा 'उप' झाल्याच्या न्यूनगंडाने देवेंद्र फडणवीस अस्वस्थ; संजय राऊतांची टीका

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Raut criticize devendra fadanvis

Mumbai News - शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यचा 'उप' झाल्याच्या न्यूनगंडाने देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत, अशी मार्मिक टीका संजय राऊतांनी केली. फडणवीस हे सदगृहस्थ आहेत. संस्कारिक आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्यासोबत बेईमानी झाली म्हणून आम्ही शिवसेना फोडली. आम्ही बेईमानी केलेली नाही तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शब्द न पाळून बेईमानी केली, असं राऊत म्हणाले.

तुम्ही जो डुप्लिकेट माल घेऊन बसला आहात ती बेईमानी आहे. एकनाथ खडसे यांनी २०१४ मध्ये कोण युती तोडली ते सांगितलं आहे. २०१९ मध्ये तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे बेईमान भाजपच आहे. आम्ही फडणवीसांना बेईमान म्हणत नाही, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना बेईमान म्हणतो ज्यांनी शब्द पाळला नाही. सध्या डुप्लिकेट हायकमांड आहे, अशी टीका त्यांनी केली.

संजय राऊतांनी सामना संपादकीयातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. यावर स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले की, आम्ही फक्त त्यांना आरसा दाखवला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना इतकी मिर्ची लागण्याची का आवश्यकता होती, थोडं थांबा अजून मिर्ची लागायची आहे, असं ते म्हणाले.

भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केलं.नितीन गडकरी यांनी केलेलं वक्तव्य सत्य आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. गडकरींची व्यथा आणि खंत बरोबर आहे. सर्व भाजप कार्यकर्त्यांची ही व्यथा आहे, आम्ही फक्त सतरंजी उचलण्यासाठी आहोत का? अशी त्यांची भावना आहे. सगळा चायना माल त्यांच्याबरोबर आहे, अशी टीका त्यांनी केली.

इंडिया आघाडीची तयारी जोरात सुरु आहे. जागावाटपावरुन महाविकास आघाडीत काहीही मतभेद होणार नाहीत. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या युतीत जागा वाटप होताना ते एकमेकांच्या छातीवर बसतील, असा दावा त्यांनी केली. ३१ ऑगस्ट रोजीच्या बैठकीसाठी जय्यत तयारी होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील बैठकीत देशाला दिशा दाखवणारे संमेलन होईल. सहा राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत. देशभरातील नेते या बैठकीसाठी येत आहेत, असं राऊतांनी सांगितलं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT