मुंबई

शिवसेनेची पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने, आमदार प्रकाश सुर्वे यांचा केंद्राला इशारा

कृष्ण जोशी

मुंबई:  मुंबईत पेट्रोलचे दर शंभरीकडे आगेकूच करीत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे शहरात ठिकठिकाणी घोडागाड्यांसह तसेच हातगाड्यांसह निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध केला. केंद्र सरकारने वेगवेगळे कर कमी करून इंधनाचे भाव कमी करावेत आणि जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा याहून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिला आहे. 

एकीकडे आज शहरात काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी वीज दरवाढीबद्दल राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी निदर्शने केली. तर शिवसैनिकांनी इंधन दरवाढीबद्दल केंद्राचा निषेध केला. या राजकीय जुगलबंदीमुळे सर्वसामान्यांची चांगलीच करमणूक झाली. 

आज बोरिवली, दादर, कुर्ला आदी ठिकाणी शिवसैनिकांनी इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने केली. कुर्ला (पू.) रेल्वे स्थानकाबाहेर कुर्ला-कलिना विभाग शिवसेनेतर्फे ही निदर्शने झाली. दादरच्या सेनाभवनशेजारील पेट्रोल पंपासमोरही शिवसैनिकांनी निदर्शने केली. बोरीवलीच्या (पू.) ओंकारेश्वर मंदिराजवळही शिवसेना विभाग क्रमांक एक तर्फे सुर्वे तसेच विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने झाली. हातात निषेधाचे फलक घेतलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत काहीकाळ वाहतूकही विस्कळीत केली.

मुंबईत पेट्रोलचे दर 93 रुपयांच्यावर गेले आहेत. या दरवाढीला केंद्र सरकारच जबाबदार आहे. कारण जगातील अन्य कित्येक देशात हे दर खूपच कमी आहेत. एकतर सध्या कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यवसाय बुडाल्याने उत्पन्न कमी झाले आहे. लोक आधीच त्रासले असून केंद्राने इंधन दरवाढ करून त्यांच्या त्रासात भर घातल्याने त्याचा निषेध करण्याची गरज आहे. केंद्राने इंधनावरील अन्य कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही सुर्वे यांनी केली. 

हातगाड्या आणल्या
 
आभाळाला दर भिडलेले इंधन परवडत नसल्याचा निषेध करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी अभिनव मार्ग वापरला होता. काहींनी भाजीविक्रेत्यांच्या हातगाड्यांवरून कार्यकर्त्यांना बसवून त्या गाड्या ढकलत आणल्या होत्या. काहींनी आपल्या दुचाकी देखील ढकलत आणल्या होत्या. काही ठिकाणी कार्यकर्ते सायकलवरून निषेध करण्यासाठी आले होते. गोरेगावात तर कार्यकर्त्यांनी घोडागाड्या आणल्या होत्या. केंद्राने इंधन दरवाढ अशीच सुरु ठेवली, तर यापुढे जनतेला प्रवासासाठी हेच मार्ग वापरावे लागतील, अशी प्रतिक्रियाही हे कार्यकर्ते देत होते.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Shivsena today protest central government fuel price hike prakash surve

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaheen Afridi : शाहिन आफ्रिदी वर्ल्डकपला मुकणार? बिग बॅश स्पर्धेत क्षेत्ररक्षण करताना गुडघा दुखावला

New Year Recharge : पटकन करा रिचार्ज, लवकरच बंद होणार आहे 1 रुपयचा प्लॅन; मिळणार 30 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, 60GB डेटा

Latest Marathi News Live Update : मनसेचे मुंबईतील उमेदवार राज ठाकरेंच्या भेटीला

National Flower : वर्षभर सगळ्यांत जास्त फूलं देणारं झाडं कोणतं? याला म्हटलं जातं 'प्राइड ऑफ इंडिया'..लाखो लोकांना माहिती नाही उत्तर

Viral Video : अतूट दोस्तीने मृत्यूलाही हरवलं ! मित्राला वाचवायला मगरींशी भिडली माकडांची टोळी, भावूक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT