मुंबई

Pinky Bhullar: उल्हासनगरातील शिवसेना शहरप्रमुख पिंकी भुल्लर यांचे निधन

Ulhasnagar: पिंकी यांनी अचानक जीवनातून एक्झिट घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

Thane : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगर पश्चिमेचे शहरप्रमुख रविंद्रसिंह उर्फ पिंकी भुल्लर यांचे आज दुपारी ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.पिंकी यांनी अचानक जीवनातून एक्झिट घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

1986 पासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले पिंकी भुल्लर हे गेल्या 15 वर्षांपासून शिवसेना प्रणित शहीद रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते.रिक्षाचालकांना कोणत्याही अडीअडचणी आल्या तर त्यांच्यासाठी पोलीस ठाण्यात धावून जाण्याची त्यांच्या पारिवारिक समस्या सोडवण्यासाठी पिंकी भुल्लर प्रसिद्ध होते.युनियनचा झेंडा हा कालापीला असल्याने ते जय महाराष्ट्र सोबतच आवर्जून जय काला पिला बोलत होते.

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेने पासून विभक्त झाल्यावर आणि त्यांनी भाजपाशी घरोबा केल्यावर पिंकी भुल्लर यांचे मोठे बंधू राजेंद्रसिंह भुल्लर हे शिंदे गटात गेले.त्यांना शहरप्रमुख करण्यात आले.

मात्र मोठा भाऊ शिंदे गटात गेल्यावरही पिंकी भुल्लर हे उध्दव ठाकरे सोबत एकनिष्ठ,निष्ठावंत राहिले.त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंकी भुल्लर यांच्यावर पश्चिम शहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती.त्यांनी पश्चिमेला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करून कल्याण लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.

8 जून रोजी मातोश्री वर झालेल्या बैठकीत पिंकी भुल्लर उपस्थित होते.त्यानंतर त्यांची प्रकृती खालावू लागल्याने त्यांना ज्युपिटर मध्ये ऍडमिट करण्यात आले.

आज तिथे त्यांची प्राणज्योत मावळली.त्यांच्या पश्चात पत्नी आणि अविवाहित मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सपोर्ट स्टाफची ‘फुगवलेली भरती’

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 जुलै 2025

नातेसंबंध टिकवायचे तर...

साप्ताहिक राशिभविष्य : (२० जुलै २०२५ ते २६ जुलै २०२५)

Chandrababu Naidu wife New: चंद्राबाबू नायडूंच्या पत्नीने ‘या’ FMCG शेअरमधून एकाच दिवसांत कमवला ७८,८०,११,६४६ रुपयांचा नफा!

SCROLL FOR NEXT