ShivSena esakal
मुंबई

शिवसेना संघटनेत फेरबदल; विभाग प्रमुखांसह शाखा प्रमुखांना धक्का

समीर सुर्वे

मुंबई : कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी आता शिवसेनेच्या (shivsena) विभाग प्रमुखांपासून शाखा प्रमुखांना भोवणार आहे. दिवाळी (Diwali Festival) नंतर शिवसेनेत मोठे पक्षांतर्गत (Internal changes in party) बदल होणार आहेत. मुंबईतील विभाग प्रमुखांपासून शाखा प्रमुखापर्यंत पदावर नव्या चेहऱ्यांना (new candidates opportunity) संधी दिली जाणार आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर हे फेरबदल करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

मुंबईत शिवसेनेचे 10 विभाग प्रमुख आहेत त्यानंतर उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख अशी पक्षांची बांधणी आहे. शाखा प्रमुख शिवसेनच्या पक्षीय बांधणीचा पाया मानला जातो. शाखा प्रमुखाचा त्या प्रभागातील नागरीकांशी थेट संपर्क असण्याची अपेक्षा असते. मात्र, विभाग प्रमुखांसह शाखा प्रमुखा बाबात तक्रारी स्थानिक कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांकडून वाढू लागल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर दिवाळी नंतर पक्षात मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फेब्रुवारी 2022 मध्ये महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत.यावेळी सत्तेत राहाण्यासाठी शिवसेनेला मुंबईत 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणावे लागणार आहेत.त्यानंतर जुळवा जुळव करुन शिवसेनेला सत्तेत कायम राहाणे शक्य होईल.त्यासाठी नाराजी असलेल्या पदाधिकाऱ्यांना बदलण्याचा विचार पक्षात सुरु आहे. सध्या शिवसेनेचे 97 नगरसेवक आहेत.त्यातील सहा नगरसेवक हे मनसेमधून फुटून आले आहेत. यात तीन अपक्षांचाही पाठींबा आहे. 84 नगरसेवक निवडून आले होते.पक्षात बंडखोरी करुन निवडून आलेल्या दाेन अपक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला.तर,इतर नगरसेवक न्यायालयीन निर्णयानुसार निवडून आले आहेत.मात्र,आता शिवसेनेला निवडणुकीतच 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणावे लागणार आहे.

बाहेरून आलेल्यांना विभाग प्रमुख नाही

शिवसेनेत इतर पक्षांतून आलेल्यांना विभाग प्रमुख पद मिळणार नाही असा निर्णय झाल्याचे समजते.त्यामुळे सुरवाती पासूनच पक्षात असलेली व्यक्ती विभाग प्रमुख पदी नियुक्त केली जाईल.तसेच,शाखा प्रमुख पदीही अशा व्यक्तीला स्थान दिले जाणार नाही.विभाग प्रमुख हा पदाधिकारी आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील दुवा मानला जातो.त्यामुळे या पदावर बोहरुन आलेल्यांना जागा देण्यात येणार नाही. तर, शाखा प्रमुख हे पद पक्षाचा पाया असल्याने तेथेही पक्षाच्या मुळ कार्यकर्त्याला स्थान देण्याचा विचार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT