uddhav thackeray narayan rane 
मुंबई

राणे विरुद्ध शिवसेना: आज मुंबईत राडा?

सर्व युवा सैनिकांना जुहू येथे जमण्याचे आदेश.

वैदेही काणेकर

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांची सध्या राज्यात जनआशीर्वाद यात्रा (janashirwad yatra) सुरु आहे. काल या यात्रेचा पाचवा दिवस होता. त्यावेळी कोकणात (kokan) महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर टीका करताना नारायण राणेंची जीभ घसरली. "मी असतो तर कानाखाली चढवली असती. हे काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देशाच्या स्वतंत्र्यदिनाची माहिती नसावी" असे आक्षेपार्ह वक्तव्य नारायणे राणे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीची भाषा केल्याने, नारायण राणेंच्या या वक्तव्याचे मुंबई आणि कोकणात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. नारायण राणेंच्या या वक्तव्यानंतर युवा सेना आक्रमक झाली आहे. सर्व युवा सैनिकांना जुहू येथे जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जुहूमध्ये नारायण राणेंचा बंगला आहे. तिथे युवा सेना मोर्चा काढू शकते, अशी चर्चा आहे. दरम्यान दादरमध्ये शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी 'नारायण राणे कोंबडी चोर' असे होर्डिंग लावले होते. पण पोलिसांनी सध्या हे होर्डिंग हटवले आहे. शिवसैनिक आक्रमक झाले, तर राणे समर्थकांकडूनही प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते.

दोन महिन्यापूर्वीच दादर शिवसेना भवनसमोर शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना झाला होता. नारायण राणेंची ही जनआशीर्वाद यात्रा सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. त्यांनी पहिल्यादिवसापासून सत्ताधारी शिवसेनेलाच लक्ष्य केले आहे. कारण त्याला मुंबई महापालिका निवडणुकीची किनार आहे. पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. काहीही करुन यंदाची पालिका निवडणूक जिंकण्याचा भाजपाचे उद्दिष्टय आहे. त्या दृष्टीने भाजपाकडून तयारी सुरु आहे. राणेंची जन आशीर्वाद यात्रा याच रणनीतीचा भाग आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

महाड येथील पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना दहीहंडी संदर्भातील प्रश्न विचारला होता. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये बोलताना राणेंची जीभ घसरली, ते म्हणाले, ''ज्यांना स्वातंत्रदिन कधी आहे हे माहिती नाही त्यांच्याबद्दल बोलणार नाही. स्वातंत्र्यदिन माहित नसलेल्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये. त्यांनी अपशकुन्यांसारखं बोलू नये. त्यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेवून बोलावे. स्वातंत्र्याचा हिरकमहोत्सव काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. हे काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देशाच्या स्वतंत्र्यदिनाच्या माहिती नसावी" असे आक्षेपार्ह वक्तव्य नारायणे राणे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

Chh. Sambhajinager Crime: बहुत केस लढ रहा हैं तू; तू खतम, केस खतम, न्यायालयाबाहेर केला ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला

Neena Kulkarni : अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार; अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनातील योगदानाबद्दल सन्मान

Latest Marathi News Live Update : बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी १४ ऑक्टोबरला मोर्चा काढणार

SCROLL FOR NEXT