मुंबई

धक्कादायक! पेटीएम वापरणाऱ्यांनो सावधान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नोटबंदीनंतर पेटीएम यांसारख्या युपीआय अॅप्सला सुगीचे दिवस आले. सरकारने देखील डिजिटल व्यवहारांवर अधिक भर दिल्याने युपीआय अॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या बरीच वाढली. प्रत्येक स्मार्टफोन युजर हे अॅप वापरू लागले.

सुट्टे पैसे देण्याच्या त्रासातून मुक्तता करणारे हे अॅप बऱ्याच प्रकारची सुट देखील देऊ लागल्याने लोक हे अॅप वापरू लागले. मात्र या सर्व अॅप्समुळे बँके संबधित सर्व खाजगी माहितीही इंटरनेटवर आपण कळत नकळत देऊ लागलो आणि यातूनच जन्माला आले आॅनलाईन गुन्हे. असाच एक आॅनलाईन गुन्हा ठाण्यातून समोर आला असून यात पेटीएम अॅपची केवायसी पूर्तता करणे एका बड्या अधिकाऱ्याला चांगलेच महाग पडले आहे. 

हा व्यक्ती एका मोठ्या खासगी कंपनीत "मॅनेजिंग डायरेक्‍टर' पदावर कार्यरत असून प्रफुल्ल गोवंडे असे या त्य़ाचे नाव आहे. प्रफुल्ल यांना दोघा भामट्यांनी वारंवार संपर्क साधून ऑनलाईन व्यवहारासाठी नव्या अॅपच्या मोहात पाडून त्यांची 13 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 23 व 24 डिसेंबर या कालावधीत घडला. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात राहणारे गोवंडे यांच्या मोबाईलवर 23 डिसेंबरला पेटीएम अद्ययावत करण्याबाबत संदेश आला. हा संदेश रोहित शर्मा नामक भामट्याने पाठवला होता.

रोहित याने मोबाईलवर संपर्क साधून पेटीएममधून बोलत असल्याची बतावणी केली. गोवंडे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळाने पुन्हा राहुल शर्मा असे नाव सांगणाऱ्या भामट्याने मोबाईलवर संपर्क साधून ऑनलाईन व्यवहार करण्याच्या एका अॅपमध्ये माहिती अद्ययावत करण्यास सांगितले. त्यासाठी "क्‍यूएस' नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. 

यासाठी केवळ एक रुपया चार्ज क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्डने भरण्यास भामट्याने सांगितल्याने गोवंडे यांनी यावर विश्‍वास ठेवला. तसेच "क्‍यूएस' ऍपवर आपली माहिती अद्ययावत केली; मात्र त्यानंतर दोन दिवसांत त्यांच्या दोन बॅंक खात्यांतून 13 लाख नऊ हजार 911 रुपये वळते झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वर्तकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

web title : Shocking! Careful for Paytm users

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT