मुंबई

धक्कादायक! कोरोनातून बरे झाल्यानंतरही येऊ शकतो मृत्यू;वाचा तज्ज्ञांनी काय दिली माहिती

भाग्यश्री भुवड



मुंबई : कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांचाही मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे कोरोनो चाचणीचा अहवाल नकारात्मक अल्यानंतरही काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

प्रसिद्द डॉक्टर आनंद दराडे (29) यांना असाच आपला जीव गमवावा लागला. बाधित डॉ. दराड यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या 70 टक्के फुफ्फूसाला संसर्ग झाला होता. त्यांना 20 दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. नंतर ते बरे देखील झाले. मात्र, रूग्णालयातून घरी जातानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांचा मृत्यू झाला. अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर मात्र कोरोनातून ब-या झालेल्या रूग्णांच्या मृत्यूचा प्रश्न चव्हाट्यावर आला.
बाधित रूग्णाच्या फुफ्फूसावर कोरोनाचे विषाणू हल्ला करतात. बऱ्याचदा बाधित रूग्ण बरा झाला तरी त्याच्या फुफ्फूसाला सूज आलेली असते. त्यामुळे आजारातून बरे झाल्यानंतरही फुफ्फूसाची चाचणी तसेच छातीचा सिटी स्कॅन काढून तपासणी कऱणे महत्त्वाचे आहे. तसेच, रूग्णाने त्यानंतरही आपली काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे वनरुपी क्लिनिकचे प्रमुख डॉ. राहूल घुले यांनी सांगितले. 

कोरोनातून बरे झाल्यानंतरही साधारणत: 28 दिवस विषाणू रूग्णाच्या शरिरात असण्याची शक्यता असते. त्यामुळे रूग्णाने घरी गेल्यानंतरही 14 दिवस होम क्वारंटाईन राहणे गरजेचे आहे. तसेच, त्यानंतरही रूग्णाने काळजी घ्यावी. मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे तसेच सार्वजनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी रुग्णांनी जाणे टाळावे,  असा सल्ला डाॅ. घुले यांनी दिला. 

कोरोनातून बरे झाल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे. कारण चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही अऩेक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे फुफ्फूसासह शरिरातील इतर अवयवांवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दीर्घकाळ उपचार करून घेणे गरजेचे आहे.
- डॉ. राहूल घुले, प्रमुख, वन रूपी क्लिनीक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Double Decker Bus Accident : भीषण दुर्घटना! डबलडेकर बस उलटली; पाच जणांचा मृत्यू ,१६ जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

Weather Update: दिवसा उन्हाचे चटके, रात्री बोचरा उकाडा; तापमान बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

Manchar News : आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाला ‘वसंतराव काणे आदर्श’ पुरस्कार

SCROLL FOR NEXT