Guru Siddappa Waghmare 
मुंबई

Worli Spa Murder Case: 21 वर्षीय गर्लफ्रेंडनेच केला वाघमारेचा गेम; वरळी स्पा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Mumbai Worli spa murder case: पोलिसांनी गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या गर्लफ्रेंडला अटक केली आहे. हत्येमागे तिच्या गर्लफ्रेंडचा देखील हात असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

कार्तिक पुजारी

Mumbai Spa Murder Case: वरळीच्या स्पामध्ये घडलेल्या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. यात गुरु वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. यात पोलिसांनी नवा खुलासा केला आहे. पोलिसांनी गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या गर्लफ्रेंडला अटक केली आहे. हत्येमागे तिच्या गर्लफ्रेंडचा देखील हात असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

वरळी पोलिसांनी गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या गर्लफ्रेंडला अटक केली आहे. हत्येच्या रात्री वाघमारेची मैत्रीण मेरी जोसेफ त्याच्यासोबत होती. मेरीला कटाची माहिती असताना देखील तिने वाघमारेला स्पा मध्ये बोलावल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच वाघमारेच लोकेशन आरोपिंसोबत तिनेच शेअर केल्याचा दावा पोलिसांनी केलाय.

गुरुसिद्धप्पा वाघमारे हा कथित आरटीआय कार्यकर्ता आणि पोलिसांच्या खबऱ्या असल्याची माहिती आहे. तो स्पा आणि मसाज पार्लरकडून खंडणी उकळण्याचा असा आरोप आहे. त्यामुळेच वाघमारेच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. आपल्या जीवाला धोका आसल्याच्या भीतीने २२ संशयितांची नावे वाघमारेने दोन्ही पायांवर आणि पाठीवर गोंदवली होती.

गुरु वाघमारे हा ५२ वर्षांचा होता. त्याच्या विरोधात बलात्कारासह अनेक गुन्ह्यांची नोंद होती. त्याने वाढदिवसादिवशी जोरदार पार्टी दिली होती. त्यानंतर तो वरळीतील स्पामध्ये आला होता. येथे त्याच्या ओळखीचे लोक होते. त्याची २१ वर्षीय गर्लफ्रेंड देखील त्याच्यासोबत होती. यावेळी तीन-चार जण त्याठिकाणी आले अन् त्यांनी धारदार शस्त्राने त्याला भोसकण्यास सुरुवात केली होती. यातच त्याचा मृत्यू झाला होता.

गुरु वाघमारेने २२ जणांची नावे आपली मांडी आणि पाठीवर गोंदवून ठेवली होती. त्यामुळे पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यास मदत मिळाली. पोलीस त्याच्या गर्लफ्रेंडची देखील चौकशी करत होते. या प्रकरणी आतापर्यंत स्पा मालकासह राजस्थानमधील तिघांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT