Mumbai News crime sakal
मुंबई

Mumbai Crime News: धक्कादायक! आधी अल्पवयीन मुलीचे केले अपहरण अन् नंतर लैगिंक अत्याचार; मुंबईतील घटना

Mumbai Crime News: एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला ढाब्यावर नेण्यात आले. तेथे तिला बिअर पाजल्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना कल्याण पूर्वत उघडकीस आली आहे

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला ढाब्यावर नेण्यात आले. तेथे तिला बिअर पाजल्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना कल्याण पूर्वत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार आशिष पांडे व त्याचा साथीदार अभिषेक डेरे यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु करत पांडे याला अटक केली आहे, तर डेरे हा फरार आहे.

कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार अल्पवयीन पिडीत मुलगी कल्याण पूर्वेत राहणारी असून त्याच परिसरात आशिष पांडे हा देखील रहातो. मुलीच्या वडीलांचा पांडे हा मित्र असल्याने मुलगी त्यास ओळखत होती. शाळेला सुट्टी असल्याने गुरुवारी दुपारी सदर मुलगी ही मैत्रिणीकडे दुपारी गेली होती. याच दरम्यान आशिष याने पिडीत मुलीला तुझ्या वडीलांनी तुला बोलावले आहे. असे सांगत तिला मैत्रिणीच्या घरातून बाहेर बोलाविले.

आपल्या दुचाकीवर तिला बसविले. यानंतर मित्र अभिषेक डेरे याला देखील त्याने सोबत घेतले. तिघे ही नांदिवली भागातील एका ढाब्यावर गेले. तेथे आशिषने जबरदस्तीने पीडित मुलीला बिअर पाजली. बिअर प्यायली नाही तर तुझ्या कुटूंबियांना ठार मारण्याची धमकी आशिषने मुलीला दिली. मुलीला जबरदस्ती बिअर पाजण्यात आली. त्यामुळे पुढे काय झाले तिला समजले नाही. आशिषने नंतर तिला एका निर्जन स्थळी असलेल्या इमारतीत नेत तिच्यावर लैगिंक अत्याचार केला.

दुपारी घराबाहेर गेलेली मुलगी संध्याकाळ झाली तरी घरी आली नाही म्हणून पालकांनी तिचा शोध सुरू केला. तिच्या मैत्रिणीला विचारणा करण्यात आली. त्यावेळी तिने ती आशीष याच्या सोबत गेली असल्याचे समजले. त्यानंतर रात्रीच्या वेळेत पीडित ती राहत असलेल्या घराच्या परिसरात गुंगीत असल्याचे कुटुंबीयांना दिसले.

दुसऱ्या दिवशी तिला विश्वासात घेऊन पालकांनी तिला घडल्या प्रकाराविषयी विचारले. त्यावेळी आशीष पांडे आपले अपहरण करून आपणास जबरदस्तीने बिअर पाजल्यावर लैंगिक अत्याचार केला आहे, असे तिने कुटुंबीयांना सांगितले. या प्रकाराने हादरलेल्या पालकांनी तातडीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन आशीष पांडे, अभिषेक डेरे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. आशिष याला तात्काळ अटक करण्यात आली आहे. तर डेरे हा अद्याप फरार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane protest: आंदोलनाचा भडका कर्नाटकात; दिलासा महाराष्ट्राला, दोन्ही राज्यांच्या हक्काचा ऊस सुरक्षित..

Latest Marathi News Live Update : निवडणुकांमुळं नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढं जाण्याची शक्यता

Pune : एक कोटी मला, एक कोटी साहेबांना; PSIने मागितली २ कोटींची लाच, ४६ लाख घेताना रंगेहाथ पकडलं

Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकावर ‘वॉर रूम’, वीस मिनिटांत प्रवाशांच्या प्रश्‍नांची सोडवणूक; गर्दीवरही नियंत्रण

Kolhapur Burglary: 'काेल्हापुरात आर. के. नगरात बंगला फोडून १७ तोळे दागिने पळविले'; रोख रकमेसह वीस लाखांचा ऐवज चोरला

SCROLL FOR NEXT