Shivsena vs Congress 
मुंबई

खळबळजनक! काँग्रेसचा शिवसेनेवर ८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा, समीर सुर्वे

मुंबई: मुंबई महापालिकांच्या निवडणुका २०२२मध्ये असल्या तरी आतापासून या निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने रणनिती आखताना दिसत आहे. त्यातच काँग्रेसने मुंबई महापालिका प्रशासनावर ८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत सत्ताधारी शिवसेना यास जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. "मालमत्ता कराच्या वसुलीत महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ७०० ते ८०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. मालमत्तांच्या 'मापात पाप' करुन अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केला आहे. एकट्या वरळीतच असा १०० कोटी रुपयांचा घोटाळा असेल", असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. प्रशासनावर अंकुश नसल्याने सत्ताधारी शिवसेना यासाठी जबाबदार असल्याचाही आरोपही त्यांनी केला.

"वरळी येथील मालमत्तेचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळाऐवजी केवळ दहा टक्क्यांपर्यंतच दाखवून कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर वसुल करण्याच्या जागी केवळ लाखाचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला. अनेक गिरण्यांच्या भुखंडाबाबतही असाचा घोटाळा करण्यात आला. हा प्रकार फक्त वरळीपुरता मर्यादित नसून संपूर्ण मुंबईत असाच प्रकार सुरु आहे. अशाप्रकारे तब्बल ७०० ते ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे", असा घणाघाती आरोप काँग्रेसने केला. "हे पैसे पालिकेच्या तिजोरीत जमा होऊन मुंबईच्या विकासासाठी वापरले जाणे गरजेचे होते. मात्र, अधिकाऱ्यांनी स्वत:च्याच तिजोऱ्या भरल्या असल्याचंही त्यांनी म्हटलं.

आयुक्तांकडे लेखी तक्रार

रवी राजा यांनी याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याची माहिती दिली. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे असून तशी मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचेही रवी राजा यांनी सांगितले.

(संपादन - विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ईश्वरपूर नामांतराची १७२ वर्षांची मागणी आम्ही पूर्ण करून नागरिकांच्या भावनांचा आदर केला'; प्रचारसभेत काय म्हणाले CM फडणवीस?

Mokshada Ekadashi 2025 Donation: आज मोक्षदा एकादशीला राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान

Latest Marathi News Live Update : पत्नीचा खून करून पतीने संपवलं जीवन

Akkalkot Politics : सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ५०० कोटी; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, 'लाडकी बहीण'बाबत काय म्हणाले...

Motivational Story : एनआयटीचा प्रवेश सोडून एनडीएमध्ये सिद्धी जैनचा ऐतिहासिक विजय; राष्ट्रपती कांस्यपदक मिळवणारी देशातील पहिली महिला

SCROLL FOR NEXT