टिटवाळा : रेल्वे स्थानक ते निमकर नाका रस्त्यावरील पदपथांवर फेरीवाल्यांनी मांडलेले बस्तान
टिटवाळा : रेल्वे स्थानक ते निमकर नाका रस्त्यावरील पदपथांवर फेरीवाल्यांनी मांडलेले बस्तान 
मुंबई

मोकळे पदपथ दाखवा, बक्षीस जिंका!

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : डोंबिवलीत फेरीवाल्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर पालिका आयुक्तांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेमार्फत कल्याण, डोंबिवली, टिटवाळा या रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे; मात्र फेरीवाला पथकाची पाठ वळताच पुन्हा त्या ठिकाणी फेरीवाले आपले बस्तान मांडत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. टिटवाळा स्थानक परिसरही याला अपवाद नाही. यामुळेच येथील टिटवाळा एज्युकेशन कल्याणकारी फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय देशेकर यांनी ‘मोकळे पदपथ दाखवा आणि पाचशे रुपये मिळवा’ असे आवाहन केले आहे. समाजमाध्यमांद्वारे देशेकर यांनी हे आवाहन करत पालिकेला चांगलीच चपराक लगावली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून फेरीवाल्यांना हटवण्यात येत असल्याचा दावा केला आहे, परंतु या दाव्यातील फोलपणा नागरिकांसमोर आला आहे. फेरीवाला कारवाई पथकाची पाठ फिरताच पुन्हा फेरीवाले रस्त्यांवर बस्तान मांडत असल्याचे चित्र नेहमीच दिसते.

याच पार्श्वभूमीवर टिटवाळा रेल्वे स्थानक ते निमकर नाका या रस्त्यावरील पदपथ मोकळे दाखवा आणि पाचशे रुपये जिंका असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने पालिकेच्या अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. देशेकर यांनी केलेल्या आवाहनाची समाजमाध्यमावर चांगलीच चर्चा होत आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत आपले हे आवाहन कायम असेल, असे देशकर यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले. 

प्रभाग क्षेत्रामार्फत या परिसरातील फेरीवाल्यांवर तसेच अनधिकृतपणे लवण्यात येणाऱ्या टपऱ्या तसेच फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे; मात्र या कारवाईत सातत्य नसल्याने फेरीवाला हटाव मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच करदात्या नागरिकांना चालण्यासाठी बांधण्यात आलेले पदपथ फेरीवाल्यांनी बळकावले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याला कायमचा लगाम घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT