Shraddha Walker Murder Case 13 people statement in four days Delhi Police esakal
मुंबई

Shraddha Walker Murder Case : चार दिवसात १३ जणांचे जबाब  

श्रद्धा हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक मागील चार दिवसांपासून वसईत तळ ठोकून बसले आहे

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : श्रद्धा हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक मागील चार दिवसांपासून वसईत तळ ठोकून बसले आहे. आज (ता. २१) रोजी पथकाने दोघांचे जबाब नोंदवले असून, एकूण १३ जणांचे जबाब दाखल करण्यात आले आहेत. श्रद्धाच्या हत्याकांडात वसई परिसरातून नवीन माहिती मिळवण्याचा दिल्ली पथक प्रयत्न करत आहे. तसेच त्यांनी हत्याकांडाचा तपास गोपनीय करण्यास सुरुवात केली आहे. श्रद्धा हत्याकांड समोर आल्यानंतर वसई, नालासोपारा आणि विरार परिसरातील तिला मदत करणारे, तसेच तिचे मित्र, मैत्रीण यांनी आपल्या भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केल्या होत्या.

त्या सर्वांना दिल्ली पोलिस पथकाने बोलावून त्यांचे जबाब घेतले आहेत. श्रद्धा आणि आफताब लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्यापासून त्यांच्या संपर्कात कोण कोण आले, श्रद्धा कंपनीत काम करीत होती तेथील व्यवस्थापकापासून ते आफताबच्या मारहाणीत ती जखमी झाल्यावर दवाखान्यात दाखल होती त्या डॉक्टरपर्यंत सर्वांचे जबाब दिल्ली पोलिसांनी घेतले आहेत. पहिल्या दिवशी तीन, दुसऱ्या दिवशी चार, तिसऱ्या दिवशी चार आणि चौथ्या दिवशी दोन असे एकूण १३ जणांचे जबाब दिल्ली पोलिसांनी घेऊन सर्व हकिगत समजावून घेतली आहे. आज ओझोन हॉस्पिटलचे डॉ. शिवाप्रसाद शिंदे आणि २३ नोव्हेंबर २०२० रोजी आफताबकडून श्रद्धाला मारहाण झाल्यानंतर तुळिंज पोलिस ठाण्यात महिलेने मदत केली, त्या पूनम बिडलान या दोघांचा जबाब घेतला आहे.

श्रद्धाची दिल्लीत हत्या करून आफताब दिल्लीहून वसईत अनेक वेळा आला होता. त्या वेळी कदाचित मृतदेहाची विल्हेवाट लावताना त्याने वसईत काही पुरावा सोडला आहे का? वसईत आल्यावर तो कुणाशी भेटला होता का? श्रद्धाच्या मिसिंगप्रकरणी माणिकपूर पोलिसांना दिलेला जबाब आणि विचारपूस करण्यासाठी वसईत बोलावले होते, तेव्हा त्याने या सर्व घटनेची त्याच्या कुटुंबीयांना किंवा मित्र परिवाराला माहिती दिली होती का? या सर्व अनुषंगानेही दिल्ली पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT