shrikant shinde criticize uddhav thackeray over visit to kalyan lok sabha constituency politics Sakal
मुंबई

देर आये दुरुस्त आये...कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे येण्याआधीच शिंदे यांची टोलेबाजी

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

शर्मिला वाळुंज

डोंबिवली- शिवसेना ही शिंदे यांचीच या निकाला नंतर प्रथमच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर येत आहेत. हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे.

ठाकरे यांच्या संवाद दौऱ्यावर खासदार शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देताना ठाकरे यांना टोला लगावला आहे. देर आये दुरुस्त आये म्हणत त्यांनी ठाकरे यांचे स्वागत केले आहे. हे सगळं आधीच केलं असत तर असेही खासदार म्हणाले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज कल्याण लोकसभा मतदारसंघात संवाद दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा, मुंब्रा परिसरातील शिवसैनिकांशी ते संवाद साधून या मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

तसेच शिवसेनेच्या शाखांना देखील ते भेटी देणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील शिवसैनिकांसाठी हा संवाद दौरा महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. पक्ष फुटी नंतर तसेच विधानसभा अध्यक्ष नार्वेकर

यांच्या निकालानंतर प्रथमच पक्षप्रमुख ठाकरे हे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी स्वतः उपस्थित राहणार आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये एक उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने ठाकरे गटाकडून शहरात मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केल्याने यावर प्रतिक्रिया देताना खासदार शिंदे म्हणाले, त्यांचे खूप खूप स्वागत आहे.

तब्बल सात तास त्यांनी माझ्या मतदारसंघासाठी दिलेले आहेत. कल्याण लोकसभेत कशा प्रकारचं काम झालेलं आहे हे देखील ते पाहतील. देर आये दुरुस्त आये... हे सर्व आधी केलं असतं तर या सात तासाचा दौऱ्याची परिस्थिती वेगळी असती. त्यांचं स्वागत माझ्या मतदारसंघात मी करतोय असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT