Ulhasnagar shrikant shinde  sakal
मुंबई

Ulhasnagar : उल्हासनगरातील पप्पू कालानी हेच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे प्रणेते ; खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची जाहीर पोचपावती

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात माजी आमदार पप्पू कालानी हेच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे प्रणेते असल्याची जाहीर पोचपावती दिली आहे

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात माजी आमदार पप्पू कालानी हेच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे प्रणेते असल्याची जाहीर पोचपावती दिली आहे.ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.शिंदे यांनी पप्पू कालानी यांच्या कामाचे गुणगान केल्यामुळे डॉ.शिंदे यांच्या जिंदादिलीचा मोठेपणा समोर आला असून यानिमित्ताने पप्पू कालानी यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांची नव्याने चर्चा शहरवाशी करू लागले आहेत.

रामनवमी निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर कार्यक्रमातील हा प्रसंग असून डॉ.शिंदे यांनी यावेळी पप्पू कालानी यांचे केलेले कौतुक मासमीडियावर व्हायरल झालेले आहे.कालानी यांनीच प्रथम सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची सुरवात केली आहे.कालानी यांनी रचलेल्या याच पायंड्याचा कित्ता नंतर इतर शहरांनी गिरवला आहे.त्यामुळेच बहुतांश शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते दिसू लागले असून कल्याण लोकसभा मतदार संघात देखील सर्वत्र काँक्रीटीकरणाच्या रस्त्यांचे काम सुरू असल्याची पोचपावती डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पप्पू कालानी यांना दिली.

डॉ.शिंदे यांच्या या जिंदादिलीच्या मोठेपणामुळे पप्पू कालानी यांनी त्यांच्या कालावधीत केलेली विकास कामे पुन्हा नागरिकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.1986 साली नगरसेवक नगराध्यक्ष व 1989 मध्ये नगराध्यक्ष असताना पप्पू कालानी यांनी शहरात 104 सिमेंट काँक्रीटच्या रिंगरूटचे जाळे पसरवले.यातील बहुतांश रस्ते हे आजही ठणठणीत आहेत.2014 मध्ये ज्योती कालानी ह्या राष्ट्रवादीच्या वतीने आमदारकीच्या निवडणुकीसाठी उभ्या होत्या.तेंव्हा उल्हासनगरात आलेले शरद पवार,गणेश नाईक यांनी देखील पप्पू कालानी यांनी काँक्रीटच्या रस्त्यांची सुरवात केल्यावर इतर शहरांनी याच रस्त्याची प्रेरणा घेतल्याची कबुली दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates: दादा गेले, बारामतीत पोहचताच सुनेत्रा पवार यांचा आक्रोश Video

Ajit Pawar Death: वराळेचा कार्यक्रम ठरला अजितदादांचा खेड तालुक्यातील अखेरचा कार्यक्रम!

Ajit Pawar Death : शरद पवार बारामतीत दाखल, हेलिकॉप्टरमधून उतरताच दुर्घटनेची माहिती घेतली

Ajit Pawar Death:अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच बाजार पेठ बंद: मंगळवेढ्यातील सलगर बुद्रुकच्या ग्रामस्थांनी घेतला निर्णय!

Ajit Pawar Plane Crash: बारामती विमान अपघातात निधन झालेली कॅप्टन शांभवी पाठक कोण?

SCROLL FOR NEXT