Shrikant Shinde on thackeray brothers Esakal
मुंबई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

राज ठाकरेंच्या यांच्या येण्यामुळे महायुतीची ताकद अजून वाढली आहे. तर राज ठाकरेंची सभा कल्याण लोकसभा मतदारसंघात झाली तर आम्हाला आनंदच असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आनेहे

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Dombivali News: उद्धव ठाकरे यांनी हाताच्या पंजाला मतदान करणार असल्याचे सांगून टाकलंय. त्यांच्या या वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही मोठी शोकांतिका असल्याचे म्हटले आहे.

एक ठाकरे हे धनुष्यबाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला मतदान करणार आहेत. इतकी वर्षे बाळासाहेब ठाकरे, सावरकर आणि हिंदुत्ववाचे नाव घेऊन ज्यांनी राजकारण केलं त्यांचे विचार आज शिल्लक सेनेने आणि त्यांच्या प्रमुखाने विकले अस सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विविध घटक पक्षांचे मेळावे घेत आहेत. महायुतीच्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेना टोला लगावला आहॆ.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की बाळासाहेबांचे विचार विकण्याचं काम राहिलेल्या शिल्लक सेनेने केलंय. त्यांच्या प्रमुखांनी केलं. आज त्यांना जे अनेक वर्ष पाहिजे होतं, ते त्यांनी आत्ता या ठिकाणी केलय. त्यांना पहिल्यापासून काँग्रेस बरोबर जायचं होतं.

काँग्रेस सावरकरांना मानत नाही, सावरकरांना रोज शिव्या देतात त्यांच्या मांडीला उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसतात... जे हिंदुत्वाला विसरले जे बाळासाहेबांच्या विचार विसरले त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा आहे. आम्हाला अभिमान आहे, हिंदुत्व बरोबर उभे राहिलो आम्ही बाळासाहेबांचा विचार बरोबर उभे राहिलो. आम्ही सावरकरांच्या विचारांबाबत उभा राहिलो. म्हणून जो आहे धनुष्यबाण आणि शिवसेना जे आहे एकच सामान्य शिवसैनिकाच्या हातामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे.

डोंबिवली मनसेचा शिंदेसाठी मेळावा...

डोंबिवलीमध्ये एक तारखेला मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मी उपस्थित राहणार, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय.

राज ठाकरेंच्या यांच्या येण्यामुळे महायुतीची ताकद अजून वाढली आहे. तर राज ठाकरेंची सभा कल्याण लोकसभा मतदारसंघात झाली तर आम्हाला आनंदच असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Ramdev Kangana Ranaut : बाबा रामदेव यांचा कंगना रणौतवर पलटवार; म्हणाले, ‘अशा लोकांबद्दल टिप्पणी करायची नाही’

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

Sugar Rate : दिवाळीपर्यंत साखर शंभरी पार जाण्याची भीती; राज्यात १८ लाख टन साठा शिल्लक

Marathi News Live Updates : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात समिती नेमणार : आरोग्यमंत्री आबिटकर

माझी इच्छा नव्हती सुनीधीकडून गाऊन घ्यायची... अवधूत गुप्तेने सांगितली 'कांदे पोहे' गाण्याची कथा; मराठी अभिनेत्रीने आधीच गायलेलं गाणं

SCROLL FOR NEXT