Aadesh Bandekar Sakal
मुंबई

Siddhivinayak Trust : फडणवीसांचे चौकशीचे आदेश; आदेश बांदेकरांमार्फत ठाकरे रडारवर?

या संदर्भात मनसेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

सिद्धिविनायक मंदिरात घोटाळा झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले आहेत. यावरुन मनसेने आदेश बांदेकर यांना खुलासा करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर फडणवीसांनी चौकशीचं आश्वासन दिलं आहे.

मुंबईतल्या सिद्धीविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या कारभारातल्या अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या संदर्भात मनसेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. या पत्राची दखल घेण्यात आली आहे.

त्यामुळे आता या ट्रस्टचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आदेश बांदेकर अडचणीत आले आहे. २०१८ साली म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना बांदेकर यांना सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता.

काय आहेत आरोप?

सिद्धीविनायक मंदिराच्या ट्रस्टने मार्च २०२० मध्ये उत्तर प्रदेशातल्या एका कंपनीकडून १५,००० ते १६,००० लीटर तूप खरेदी केलं. पण त्यानंतर लॉकडाऊन लागल्याने मंदिर बंद झालं होतं. त्यानंतर ट्रस्टींनी तूप विकलं असा आरोप करण्यात आला आहे. शिवाय मंदिर उघडल्यानंतर क्यू आर कोड बसवण्याचं काम करण्यात आलं. त्यासाठी ४०-५० लाख खर्च असतानाही साडेतीन कोटींचं कंत्राट देण्यात आलं. हा भ्रष्टाचार असल्याचा आरोप सदा सरवणकर यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT