silly reason dispute three killed one person mumbai crime marathi news Sakal
मुंबई

Dombivli Crime : किरकोळ वादातून तिघांनी दगडाने ठेचून केली हत्या

विष्णुनगर पोलिसांनी 16 तासात केला हत्येचा उलगडा...दोघांना अटक

शर्मिला वाळुंज

डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील खाडी किनारी सोमवारी एक मृतदेह आढळून आला होता. सदर इसमाच्या डोक्यावर वार केल्याच्या खुना होत्या. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी 16 तासात मृतदेहाची ओळख पटवित, आरोपींचा शोध घेत हत्येचा उलगडा केला आहे.

सोमनाथ शिंदे (वय 44) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी योगेश डोंगरे (वय 43) व विलन टावरे (वय 41) यांना अटक केली असून तिसरा आरोपी दीपक करकडे याचा पोलीस शोध घेत आहेत. दारू पिऊन किरकोळ वाद झाला. या वादात सोमनाथ याच्या डोक्यात मारेकऱ्यांनी दगड घातला. यात सोमनाथ खाली पडल्याने तिघांनी त्याच्यावर आणखी वार करत त्याची हत्या केल्याची बाब उघड झाली आहे.

सोमवारी डोंबिवली पश्चिमेला देवीचापाडा खाडी किनारी एका पुरूषाचा मृतदेह खाडी किनारी तरंगत असल्याची माहिती पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांना दिली होती.

सदर माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला होता. मयताच्या डोक्यात मारहाणीच्या खुणा आढळल्याने त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना होता. या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांची 4 पथक तैनात करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ व इतर अंगाने तपास करत पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यास सुरवात केली.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरीक्षक भवर, पोलीस हवालदार दिपविजय जमादार, शकिल जमादार, राजेश पाटील, नितीन भोसले, हृषीकेश सकपाळ, मनसब पठाण, प्रशांत दिवटे, निसार पिंजारी यांच्या पथकाने शोध सुरू केला.

मृत व्यक्तीचे कपडे एका रिक्षातील व्यक्तीशी जुळत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसुन आले. त्या रिक्षाचा पोलिसांनी शोध घेतला असता मोठागाव येथून पोलिसांनी योगेश आणि विलन याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांचा तिसरा साथीदार याचा शोध घेतला जात असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी सांगितले.

मयत सोमनाथ हा फुले नगर येथे राहणार असून तो व आरोपी एकमेकांचे परिचित होते. सोमनाथ हा कधी रिक्षा चालवीत असे तर कधी वेठबिगारीचे काम देखील करत असे. आरोपी व सोमनाथ हे एकत्र दारू पित असत. त्यातून त्यांचे वाद होत असत. शनिवारी त्यांच्यात किरकोळ भांडण झाले. या भांडणातून आरोपींनी सोमनाथ शिंदे याला डोक्यात दगड घालून ठार मारले. नंतर त्यांचा मृतदेह खाडीत फेकून दिला होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT