Sim Card Scam 170 SIM cards sold market fake documents of customers women arrested crime mumbai Sakal
मुंबई

Sim Card Scam : डोंबिवलीत सिम कार्डचा काळाबाजार; 170 ग्राहकांच्या बनावट कागदपत्रावर सिमकार्डची बाजारात विक्री

सिमकार्डचा काळा बाजार करणाऱ्या हर्षदा पराडकर या महिलेला अटक

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - रस्त्यावर सिमकार्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या कागदपत्रांच्या आधारे बनावट कागदपत्र तयार करुन त्याआधारे सिमकार्डची विक्री डोंबिवलीतील मार्केटमध्ये खुले आम सुरु आहे.

डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या पथकाने मारलेल्या छाप्यात एका महिलेने अशा प्रकारे तब्बल 170 ग्राहकांच्या नावाने सिमकार्ड काढून ते बाजारात जादा दराने विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.

सिमकार्डचा काळा बाजार करणाऱ्या हर्षदा पराडकर या महिलेला पोलिसांनी अटक केली असून याचे धागेदोरे पोलिस तपासत आहेत. गुन्हे घडविण्यासाठी अनेकदा अशा सिमकार्डचा वापर होत असल्याने रस्त्यावर विक्रेत्यांकडून सिम कार्ड खरेदी करु नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

डोंबिवली स्टेशन परिसरात दुकानदार विक्रेत्यांचे अधिकृत कोड वापरत रस्त्यावर सिम कार्डची विक्री छोट्या विक्रेत्यांकडून केली जाते. या विक्रेत्यांकडून अनेकदा ग्राहक सिमकार्ड घेतात, त्यावेळी आपल्या आधार कार्डचा पुरावा सादर करतात.

ग्राहकांच्या आधारकार्डवर वेगवेगळे फोटो वापरुन बनावट आधारकार्ड तयार करत त्या आधारे नविन सिमकार्डची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथकाची नेमणूक करत स्टेशन परिसरात छापा टाकत हर्षदा पराडकर या महिलेला ताब्यात घेतले.

चौकशीत हर्षदाने डोंबिवली पूर्वेतील गणेश इलेक्ट्रिक शॉपचे डीलर कोड वापरून स्टेशन परिसरात वोडाफोन - आयडिया कंपनीचे सिमकार्ड विक्रीचा स्टॉल तिने लावला होता. येथे सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांच्या आधारकार्डवर वेगवेगळे फोटो लावून बनावट आधारकार्ड तयार करत त्या आधारे नविन सिम कार्ड जादा दराने ती ग्राहकांना विक्री करत होती असे सांगितले. 170 ग्राहकांच्या नावे सिम कार्ड काढल्याची माहिती तिने पोलिसांना दिली आहे.

बाजारात बनावट सिम कार्डच्या आधारे ऑनलाईन फसवणूक, धमकी, सोशय मिडीयावरील गुन्ह्यांत वापर केला जातो. हर्षदा हीने किती लोकांना सिमकार्ड विकले आहेत याची माहिती पोलिस घेत आहेत.

टेली कम्युनिकेशन गोरमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने सिम कार्ड वापरण्याची यादी पाठवण्यात आली आहे. या यादीनुसार राज्यात सर्व ठिकाणी छापेमारी सुरू असून ग्राहकांनी स्टेशन परिसर किंवा अनधिकृत दुकानावर सिमकार्ड घेऊ नये.

तुमच्या दस्तावेजचा वापर करून तुमच्या नावावर दुसरे सिम कार्ड काढून त्यावर कुठल्याही प्रकारचे क्राईम झाल्यास तुम्हालाच तुरुंगवास भोगावा लागेल. त्यामुळे अधिकृत विक्रेत्याकडूनच सिमकार्ड घ्यावे असे आवाहन सहाय्यक पोलिस आयुक्त कुराडे यांनी नागरिकांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT