k k  singer died
k k singer died esakal
मुंबई

सुप्रसिद्ध गायक केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सकाळ डिजिटल टीम

Singer KK Passes away

सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नत्त उर्फ केके यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन. ते ५३ वर्षांचे होते. कोलकता येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान ही घटना घडली.

आज (मंगळवारी) कोलकाता येथील नझरूल मंच येथे केके यांचा गाण्याचा कार्यक्रम होता. परफॉमन्स संपल्यावर केके यांना कार्यक्रमस्थळीच हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CMRI) येथे नेण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी केके यांना मृत घोषित केले. केके यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. (kk singer full name)

23 ​​ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांना केके म्हणूनच जास्त ओळखलं जायचं. केके यांनी हिंदीत जवळपास २०० हून अधिक गाणी गायली आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘तडप तडप...’ गाण्याने त्यांना बाॅलीवूडमध्ये ओळख मिळवून दिली होती. त्यांचा ‘पल’ म्युझिक अल्बम गाजला होता. (singer kk songs) ओम शांती ओम, गँगस्टर, दस अशा अनेक सिनेमासाठी त्यांनी गाणी गायली आहेत. फक्त हिंदीच नाही तर तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

दिल्ली येथे एका मल्याळी कुटुंबात जन्मलेल्या केके यांचं शिक्षण सेंट मेरी शाळेत झालं. लहानपणी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या केके यांनी काही काळ एका हॉटेल मध्ये नोकरी देखील केली. सोबत गायनाचा छंद देखील जोपासला. याच छंदाचं रूपांतर पुढे करियरमध्ये केलं. दिल्लीहुन मुंबईला आल्यावर लेस्ली लुईस, रणजित बारोट यांच्याकडे त्यांनी गायनाची ऑडिशन दिली. त्यांनी केके यांना जाहिरातीसाठी जिंगल्स गाण्याची संधी दिली. जवळपास ३५०० जिंगल्स गायल्या नंतर त्यांना सिनेमात गाण्याची संधी मिळाली. लेस्ली लुईस यांना तेव्हापासून ते आपला गुरु मानायचे. पुढे ए आर रहमान पासून ते प्रीतम अशा विविध स्टाईलच्या संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं. स्क्रीनपासून अनेक अवॉर्ड त्यांना मिळाला होता. 1999 च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघासाठी त्यांनी गायलेले “जोश ऑफ इंडिया” हे गीत आजही अनेक जण विसरू शकत नाहीत.

केके यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. गायक अदनान सामी यांनी केके यांचं निधन वेदनादायी असल्याचं म्हटलंय. तर राहुल वैद्य याने ट्विटमध्ये म्हटलंय,

केके यांचं निधन झाल्याचं मला आत्ताच समजलं. देवा, हे काय सुरूये. केके सर चांगले व्यक्ती होते. ५३ वर्षीचं त्याचे निधन होणं हे धक्कादायक आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रात्री उशिरा ट्विट करून केके यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले,

"प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले, जे के.के. त्याच्या गाण्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांमध्‍ये विविध प्रकारच्या भावनांचे प्रतिबिंब दिसून आले. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती"

तर केके यांची सहकारी गायिका श्रेया घोषाल यांनी देखील ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्या म्हणतात, केके चं अकाली जाणं मी अजूनही पचवू शकलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT