मुंबई

सिंगल विंडो सिस्टमचा एमआयडीसीला आधार! कोरोनाकाळात उद्योजकांची गैरसोय दूर

शरद वागदरे

वाशी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचा (एमआयडीसी) कारभार कागदपत्रांद्वारे चालत होता. त्यामध्ये मोठ्या प्रमणात बदल करण्यात आले असून एमआयडीसीची "ई कनेक्‍ट'कडे वाटचाल सुरू आहे. त्यासाठी "सिंगल विंडो सिस्टम' सुरू करण्यात आली आहे. कोरोनाकाळात लॉकडॉऊन लागू करण्यात आल्यानंतर कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये, यासाठी शासनाने सरकारी कार्यलयात येण्यासाठी कामागारांची कपात करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या कालखंडात काम थांबू नये, यासाठी या पद्धतीमुळे ऑनलाईन पद्धतीनेचे अर्ज मागवण्यात आले. त्यामुळे उद्योजकांसह कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळाला. 

नवी मुंबईतील टीटीसीसह पातळगंगा आणि तळोजा या भागात सुमारे 8,500 कंपन्या आहे. त्यांना विविध कामांसाठी एमआयडीसीच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. मात्र, 2018 पासून सिंगल विडो सिंस्टम सुरू करण्यात आली. याद्वारे भूखंडाच्या वापरात बदल, भुखंडाचे एकत्रिकरण, भूखंडाचे विभाजन, निवासी भूखंडासाठी वापरात बदल, प्रापार्टी कार्ड आदी 14 सेवा ऑनलाईन झाल्या. यासाठी 6 दिवसींपासून 30 दिवसांच्या मुदतीत एमआयडीसीच्या कार्यालयाला काम करणे अनिवार्य आहे. त्यामुळे कारखानदारांसह कर्मचाऱ्यांना मोठा आधार ठरत आहे. 

टीटीसी, पातळगंगा आणि तळोजा या भागातील सिंगल विडो सिस्टमला कोरोनाच्या कालखंडातील एप्रिल ते ऑक्‍टोबर 2020 मध्ये दोन हजार 162 अर्जाची नोंद करण्यात आली. एक हजार 790 अर्ज पात्र झाले असून तेवढे अर्ज निकाली काढण्यात आले आहे; तर 372 अर्जावर कार्यवाही सुरू आहे. 

कोरोनाकाळात एमआयडीसीचे कार्यालय बंद नव्हते; मात्र कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी एमआयडीसीकडून सुरू करण्यात आलेल्या "सिंगल विंडो सिस्टम'मुळे कारखानदारांना कार्यालयात येण्याची गरज लागत नव्हती; तर 14 सेवा "सिंगल विंडो सिस्टम'मुळे मिळाल्या. 

- सतीश बागल, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी 

single windown system support by MIDC for the convenience of businesses
---------------------------------------------------------

  ( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT