मुंबई : मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्युदर कमी होत असला तरी धारावीतील परिस्थिती 'जैसे थे' असल्याचे समोर येत आहे. आज धारावीमध्ये नवे 16 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून त्यात पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याचा ही समावेश आहे.
शनिवारी सापडलेल्या 16 नव्या रुग्णांपैकी 10 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. त्यातील 15 रुग्ण तरुण आहेत तर रुग्णांमध्ये केवळ एका 61 वर्षीय वयस्क महिलेचा समावेश आहे. डॉ. बलिगा नगरमधील एका 18 वर्षीय महिला रुग्ण मरकजमधील बाधित रुग्णाची नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.
आज सापडलेले रुग्ण हे नाईक नगर, कामराज स्कुल, डॉ. बलिगा नगरमधील राहणारे आहेत. रुग्णांमध्ये पालिकेच्या एम वॉर्डमधील 40 वर्षीय कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. तो धारावीतील नागरी आरोग्य केंद्रात कार्यरत होता.
धारावीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 117 वर पोहोचली असून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दादरमधील गोखले रोड वरील कुलकर्णी हाईट्स मधील एका 65 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली असून दादर मधील बाधितांची संख्या 22 झाली आहे. नव्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.