मुंबई

मुंबईत परिस्थिती नियंत्रणात! आज 743 नवीन रुग्णांची भर; तर रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर

मिलिंद तांबे



मुंबई : मुंबईत आज कोरोना बाधित रुग्णांची संख्या तुलनेत कमी झाली असून आज 743 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,37,091 झाली आहे.मुंबईत आज 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,439 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,025 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्के इतका आहे.                                                

मुंबईत आज नोंद झालेल्या 20 मृत्यूंपैकी 16 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 13 पुरुष तर 7 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 20 रुग्णांपैकी एकाचे वय 40 वर्षा खालील होते. 13 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 6 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.

कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 1,025 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,11,084 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 87 दिवसांवर गेला आहे. तर 23 ऑगस्ट पर्यंत एकूण 7,09,583  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर  17 ऑगस्ट  ते 23 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.80 इतका आहे. 

मुंबईत 604 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,834 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 4,268 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 3,074 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT