स्मृती उद्यानाकरिता पालिकेकडे ६५० अर्ज दाखल 
मुंबई

स्मृती उद्यानाकरिता पालिकेकडे ६५० अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : पर्यावरण संवर्धनासह स्मृतिवनातून प्रियजनांच्या स्मृती जपण्यासाठी पालिकेने स्मृती उद्याननिर्मिती करण्याचे नियोजन केले आहे. १५ जूनपासून स्मृतिवृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली. याला शहरातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ६५० अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती उद्यान विभागाने दिली आहे.

महापालिकेकडून हरित नवी मुंबई संकल्पना राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत शहरात हिरवळ निर्माण करण्यासाठी वृक्षलागवड केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून स्मृती उद्यान निर्माण केले जात आहे. नेरूळ येथील सेक्‍टर २६ मध्ये ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे हे स्मृतिवन विकसित करण्यात येत आहे. २० मेपासून ऑगस्टअखेरपर्यंत स्मृति उद्यानाकरिता पालिकेकडे ६५० अर्ज दाखल झाले असल्याची माहिती उद्यान विभागाने दिली. यामध्ये बालकाच्या जन्माच्या आनंदानिमित्त शुभेच्छा वृक्ष, शुभविवाहाचे औचित्य साधून शुभमंगल वृक्ष, परीक्षा व इतर क्षेत्रातील यशाबद्दल आनंद वृक्ष, सासरी जाणाऱ्या मुलीसाठी शुभेच्छा म्हणून माहेरची झाडी, प्रियजनांच्या मृत्यूनंतर स्मृतिवृक्ष अशा विविध प्रसंगाची आठवण वृक्ष रोपे लागवड करून जपण्याची संकल्पना आहे. यामध्ये प्रियजनांच्या मृत्यूनंतर स्मृतिवृक्षाकरिता अधिक अर्ज दाखल झाले आहेत. अद्यापर्यंत ४५० वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

२० मेपासून स्मृती उद्यानाकरिता शहरातील नागरिकांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली. त्यास नवी मुंबईकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला असून, पालिकेकडे ६५० अर्ज दाखल झालेले आहेत. १ हजार वृक्षलागवडीचे लक्ष्य असून, तोपर्यंत नागरिकांकडून अर्ज स्वीकारले जातील. अद्यापपर्यंत ४५० वृक्षांची लागवड करण्यात आली असून, महिनाअखेरपर्यंत ६५० वृक्षलागवड होईल.
- नितीन काळे, उपायुक्त, उद्यान विभाग, नवी मुंबई महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

SCROLL FOR NEXT