मुंबई

आता साधी शिंक आली तरी कोरोनाची भीती वाटतेय...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आमच्या बाजूच्या इमारतीत कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला होता. त्यामुळे आम्हाला कोरोना होणार नाही ना? सारख्या शिंका येत आहेत... कोरोना तर नाही ना? असे प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. 

कोरोना प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या मनात भीती तयार झाली आहे. काही जणांना तर श्‍वास घेतल्यानेही कोरोना होईल, अशी धास्ती वाटते. कोरोनामुळे भयभीत झालेल्या नागरिकांचे दूरध्वनी मोठ्या प्रमाणात येत आहेत, असे मनोविकार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. कोरोना म्हटल्यावर लोकांना मृत्यूच समोर दिसतो. शिंक आली, नाक चोंदले तरी कोरोना झाल्याचे लोकांना वाटते. सतत शिंका येत असल्यामुळे कोरोनाची लागण झाल्याच्या शंकेने एका नोकरदार महिलेची झोप उडाली होती, असे केईएम रुग्णालयातील मानोसपचार विभागप्रमुख डॉ. शुभांगी पारकर म्हणाल्या. 

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

व्यसनांची गरज पूर्ण न झाल्यासही हातपाय कापणे, अस्वस्थता वाटणे, नैराश्‍य येणे अशी लक्षणे दिसतात. शरीरातील पाण्याची पातळीही कमी होते. अशा स्थितीत वारंवार पाणी पिणे आणि आहारातील ब जीवसत्त्वाचा समावेश वाढवणे गरजेचे आहे. ही लक्षणे बळावल्यास तर तत्काळ वैद्यकीय उपचार करावे लागतात, असे मिरा रोड येथील वोक्‍हार्ट रुग्णालयाच्या मानसोपचार सल्लागार डॉ. सोनल आनंद यांनी सांगितले. 


मद्य किंवा अंमली पदार्थ मिळत नसल्याने व्यसनाधीन व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावरही अनिष्ट परिणाम होत असल्याचे आढळत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात अशा अनेक व्यक्तींकडून तक्रारी आल्या होत्या. त्यांनाही वैद्यकीय उपचारांची गरज असते. 
- डॉ. सागर मुंदडा, मनोविकार तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT