Anil Deshmukh sakal
मुंबई

मुंबई : अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

सुमारे १४ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

राहुल शेळके

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मध्यरात्री सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. सुमारे १४ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. देशमुख यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Anil Deshmukh money laundering case update)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यावरून केंद्रीय तपास यंत्रणांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. या कारवाईने महाविकास आघाडी सरकारच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. आजपर्यंत ‘ईडी’ने चार वेळा देशमुख यांना समन्स पाठवले होते. मात्र त्यांनी वकिलांच्या मार्फत उत्तर देत कारवाईचा तपशिल मागितला होता. (Param Bir Singh allegations)

‘ईडी’च्या संभाव्य कारवाईच्या विरोधात न्यायालयीन लढाईत अपयश आल्यानंतर देशमुख सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचले. तब्बल १४ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. अखेर रात्री एकच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. देशमुख रात्रभर ईडी कार्यालयात असतील. मंगळवारी सकाळी त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले जाईल. यानंतर सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT