Crime sakal
मुंबई

Dombivali Crime : चिमुकल्या मुलांना बांधून ठेवून लाकडी पट्टीने मारहाण; घटना मोबाईल कॅमेरात कैद

डोंबिवलीतील पाळणाघरातील धक्कादायक प्रकार

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - नोकरदार पालक आपल्या लहान मुलांचा आपल्या पाठी नीट सांभाळ व्हावा म्हणून डे केअर सेंटर मध्ये विश्वासाने त्यांना ठेवून जातात. मात्र या विश्वासाला तडा देऊन डे केअर सेंटर मध्ये सांभाळ करणारे कर्मचारी, सेंटर चालक मुलांना मारहाण व संताप जनक वागणूक देत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला असून डोंबिवलीत एकच खळबळ व्यक्त होत आहे.

सेंटर मधील व्हिडीओ व पालकांच्या तक्रारीवरून डोंबिवली पोलीस ठाण्यात पाळणा घर चालवणाऱ्या गणेश प्रभुणे ,आरती प्रभुणे या दांपत्यासह राधा नाखरे या महिलेविरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणी पुढील तपास सुरू केला .

धकाधकीच्या जीवनात संसाराचा गाडा हाकण्यासाठी घरातील कर्त्यांना नोकरी करावीच लागते. पालक नोकरीवर जात असल्याने लहान मुलांची परवड होऊ नये त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून या चिमुकल्याना पाळणा घरात ठेवले जाते. पाळणाघर चालक त्यासाठी शुल्क देखील आकारतात.

याठिकाणी आपल्या मुलांचा चांगला सांभाळ होत असेल या विश्वासाने पालक मुलांना येथे दिवसभर सोडून कामावर जातात. पण त्यांच्या पाठी सेंटर मध्ये मुलांचा नीट सांभाळ होत आहे की नाही याची खात्री पालकांनी करणे गरजेचे झाले आहे. पालकांच्या पाठीमागे सेंटर मध्ये मुलांचा छळ केला जात असल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे.

डोंबिवलीतील हॅप्पी किड्स डे केअर सेंटर असून यामध्ये लहान मुलांचा सांभाळ केला जातो. सेंटर चालवणाऱ्यांसह येथील कर्मचाऱ्यांकडून येथील मुलांना अयोग्य वागणूक मिळत असल्याचे समोर आले आहे.

डोंबिवली पूर्वेत राहणारे मंदार उगले व त्यांचे पत्नी हे दोघे कामावर जातात. त्यांची तीन वर्षाची मुलगी ही डोंबिवली फडके रोड येथील हॅपी किड्स डे केअर या पाळणाघरात ठेवतात. हे पाळणाघर प्रभुणे दाम्पत्य चालवते. मुलीला सांभाळण्यासाठी हे दांपत्य साडेआठ हजार रुपये रक्कम उगले यांच्याकडून घेते. गणेश प्रभुने त्यांची पत्नी आरती प्रभुणे व राधा नखरे हे तिघे लहान मुलांचा सांभाळ करतात.

उगले यांच्या मुली सोबत आणखी अनेक लहान मुलं या पाळणाघरात सांभाळण्यासाठी ठेवले जातात. प्रभुणे दाम्पत्य व राधा नाखरे यांच्याकडून लहान मुलांना बांधून ठेवले जात होते. त्याला मारहाण केली जात होती त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. याच दरम्यान या पाळणा घरात साधना सामंत ही महिला देखील काम करण्यास गेली. तिने हा सगळा धक्कादायक प्रकार पाहिला. तिने सुरुवातीला विरोध केला मात्र प्रभुणे दाम्पत्य काही ऐकत नव्हते.

अखेर सामंत यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी कविता गावंड यांना दिला. कविता यांनी संबंधित पालकांना फोन करून सगळ्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी गावंड यांच्यासहित रामनगर पोलीस ठाणे गाठले. सुरुवातीला पोलिसांनी तुम्ही चाईल्ड वेल्फेर मध्ये जा अस सांगत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली.

मात्र घटनेची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे याना मिळाली. त्यांनी तात्काळ तक्रार दाखल करून घेण्याचा सूचना संबंधितांना दिल्या. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात गणेश प्रभुणे, आरती प्रभुणे या दांपत्यासह राधा नाखरे या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र या धक्कादायक घटनेमुळे डोंबिवलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्या लहान मुलांना शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT