मुंबई

Mumbai News: वानखेडेवरील आयपीएलचा थरार शाळकरी मुले अनुभवणार; कसा? वाचा सविस्तर

७ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवरील लाईव्ह आयपीएल क्रिकेटचा थरार आता बच्चे कंपनीला अनुभवायला मिळणार आहे |small children will get to experience the thrill of live IPL cricket at Wankhede Stadium on 7th April |

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: सद्या आयपीएसची धुम सुरू आहे. सगळेच आयपीएल क्रिकेट सामन्याचा आनंद लुटत आहे. येत्या रविवारी, ७ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवरील लाईव्ह आयपीएल क्रिकेटचा थरार आता बच्चे कंपनीला अनुभवायला मिळणार आहे.

वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल सामन्याचा आनंद मुलांना लुटता यावा यासाठी एज्युकेशन ऑफ स्पोर्ट्स अँड ऑल या संस्थेने तब्बल बेस्टच्या ५०० एसी व नॉन एसी बसेस बुक केल्या आहेत. बेस्टला यामुळे चांगला महसूल मिळणार आहे.

बेस्टचा सुरक्षित व आरामदायी प्रवास म्हणून प्रवासी आजही बेस्ट बसेसना पसंती देतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट बसेस पर्यटकांसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध केल्या आहेत. वाढदिवस, मुंबई दर्शन आदींसाठी बेस्टच्या बसेस बूक केल्या जातात. आता चक्क आयपीएल मॅचसाठी बेस्ट उपक्रमाच्या एसी व नॉन एसी बसेस बूक केल्या आहेत.

बच्चे कंपनीलाही हा थरार अनुभवता यावा यासाठी एज्युकेशन ऑफ स्पोर्ट अँड ऑल या संस्थेच्या वतीने बसेसचे बूकिंग केले आहे. यामध्ये एका बसचे भाडे १२ ते १६ हजार रुपये इतके आहे. यामुळे बच्चे कंपनीला प्रत्यक्ष स्टेडियमवरुन लाईव्ह आयपीएल क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे. यासाठी ५०० एसी व नॉन एसी बसेस बूक केल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. यामुळे बेस्टलाही चांगलाच महसूल मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT